ICICI बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी, गृहकर्जाच्या हप्त्याची रक्कम कमी होणार?

ICICI Bank | 1 सप्टेंबरपासून गृहकर्जाच्या नव्या व्याजदरानुसार तुमच्या कर्जाचा मासिक हप्ता (EMI) ठरेल. ICICI बँकेकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, गृहकर्जावर 7.25 टक्के इतका I-MCLR1Y लागू करण्यात आला आहे.

ICICI बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी, गृहकर्जाच्या हप्त्याची रक्कम कमी होणार?
आयसीआयसीआय होम फायनान्स कंपनी 600 लोकांना देणार नोकऱ्या
Follow us
| Updated on: Sep 05, 2021 | 6:47 AM

मुंबई: गेल्या काही महिन्यांमध्ये रिझर्व्ह बँकेने रेपो रेट कमी ठेवल्याने अनेक बँकांनी आता ग्राहकांना त्याचा फायदा द्यायला सुरुवात केली आहे. गृहकर्ज घेतलेल्या आयसीआयसीआय बँकेच्या ग्राहकांना याचा फायदा मिळेल. आयसीआयसीआय बँकेने गृहकर्जाचा व्याजदर कमी केला आहे. 1 सप्टेंबरपासून नवे व्याजदर लागू झाले आहेत. बँकेने आपल्या ग्राहकांना मेसेज पाठवून याबद्दल कळवले आहे. (ICICI bank home loan EMI will get decreases)

त्यानुसार 1 सप्टेंबरपासून गृहकर्जाच्या नव्या व्याजदरानुसार तुमच्या कर्जाचा मासिक हप्ता (EMI) ठरेल. ICICI बँकेकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, गृहकर्जावर 7.25 टक्के इतका I-MCLR1Y लागू करण्यात आला आहे. सप्टेंबरपूर्वी MCLR च्या बेसिस पॉईंटनुसार ICICI बँकेचा गृहकर्जाचा व्याजदर 7.7 टक्के इतका होता. 1 सप्टेंबरपासून तो 7.55 टक्के इतका असेल. त्यामुळे ऑक्टोबर महिन्यापासून आयसीआयसीआय बँकेतून गृहकर्ज घेतलेल्या ग्राहकांचा प्री- ईएमआयचा हप्ता किंचित का होईना पण कमी होईल.

जाणून घ्या प्लॉट लोन आणि होम लोनमध्ये काय फरक असतो?

MCLR म्हणजे काय?

MCLR चा अर्थ मार्जिनल कॉस्ट ऑफ फंडस बेस् लेंडिंग रेटस् असा होतो. व्यावसायिक बँकांद्वारे MCLRच्या बेसिक पॉईंटसवर व्याजदर निश्चित केले जातात. एप्रिल 2016 पासून ही पद्धत अंमलात आली होती. तुम्ही जेव्हा एखाद्या बँकेतून कर्ज घेता तेव्हा बँकेकडून कर्जावरील व्याजदराची एक किमान पातळी निश्चित करण्यात आलेली असते. यापेक्षा कमी व्याजाने कोणतीही बँक तुम्हाला कर्ज देत नाही. 2016 पासून त्याऐवजी MCLR ही प्रमुख आधारपातळी म्हणून वापरली जाऊ लागली.

MCLR चा फायदा?

बँकांकडून देण्यात येणाऱ्या कर्जांच्या व्याजदरात सुसूत्रता यावी, या उद्देशाने MCLR संकल्पना अस्तित्त्वात आली होती. बँका आणि ग्राहक दोघांनाही परवडेल आणि झेपेल इतक्या व्याजदराने कर्ज उपलब्ध करून देणे, हा MCLR चा उद्देश आहे. MCLR च्या अंमलबजावणीनंतर बँकाची कर्ज वितरण प्रक्रिया अधिक पारदर्शक झाली होती.

संबंधित बातम्या:

भारती एक्सा जनरल इन्शुरन्स आऊट, ICICI Lombard ला अधिग्रहणासाठी मंजुरी, जाणून घ्या…

Just Dial नंतर आणखी एक कंपनी रिलायन्सच्या ताब्यात, इतक्या कोटींचा व्यवहार

उज्ज्वला योजनेंतर्गत अर्ज करण्यासाठी काय आवश्यक?, ‘या’ पेपरशिवाय LPG सिलिंडर मिळणार नाही

(ICICI bank home loan EMI will get decreases)

Non Stop LIVE Update
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड.
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा.
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक.
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा.
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?.