AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुमचं सोनं खरं की खोटं; आता ओळखा या अ‍ॅपच्या माध्यमातून

सोन्याची खरेदी करताना बनावट दागिन्यांची भीती अनेकांना वाटते. पण आता ग्राहकांची ही चिंता दूर होणार आहे. भारत सरकारने एक सरकारी अ‍ॅप लॉन्च केलं आहे, ज्याच्या मदतीने तुम्ही तुमच्या सोन्याच्या दागिन्यांची शुद्धता आणि हॉलमार्किंग घरबसल्या पडताळू शकता.

तुमचं सोनं खरं की खोटं; आता ओळखा या अ‍ॅपच्या माध्यमातून
| Edited By: | Updated on: Jul 11, 2025 | 9:27 PM
Share

भारतामध्ये सोनं हे केवळ दागिन्याचं माध्यम नसून, अनेक कुटुंबांसाठी हे एक मौल्यवान गुंतवणूकसुद्धा आहे. मात्र, याच सोन्यात खोटेपणा टाकून ग्राहकांची फसवणूक होऊ नये म्हणून सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. आता भारतात विकल्या जाणाऱ्या सर्व सोन्याच्या दागिन्यांवर ‘HUID’ म्हणजेच Hallmark Unique Identification नंबर असणे बंधनकारक करण्यात आलं आहे. आणि या क्रमांकाची सत्यता तपासण्यासाठी सरकारने अधिकृत अ‍ॅपही उपलब्ध करून दिलं आहे त्याचे नाव आहे BIS CARE App.

BIS म्हणजे काय आणि HUID ची गरज काय?

BIS (Bureau of Indian Standards) ही भारत सरकारची अधिकृत संस्था आहे, जी सोन्याच्या आणि इतर मौल्यवान धातूंच्या गुणवत्तेचं प्रमाणपत्र देते. सोन्याच्या दागिन्यांवर जो HUID नंबर कोरला जातो, तो एक 6 अंकी अल्फान्यूमेरिक कोड असतो, जो त्या दागिन्याच्या शुद्धतेची ओळख असतो. त्यामुळे सोनं विकत घेताना केवळ वजन नव्हे तर शुद्धतेची खात्री असलेला ‘हॉलमार्क’ पाहणं अत्यंत गरजेचं आहे.

BIS CARE अ‍ॅप काय आहे आणि कसं वापरायचं?

सोन्याच्या शुद्धतेबाबत कोणतीही शंका असेल, तर तुम्ही BIS CARE अ‍ॅपद्वारे ती तपासू शकता. हे अ‍ॅप Google Play Store आणि Apple App Store दोन्हीवर मोफत उपलब्ध आहे. अ‍ॅप डाऊनलोड केल्यानंतर युजरने आपलं नाव, मोबाईल नंबर आणि ईमेल अ‍ॅड्रेस नोंदवून लॉगिन करावं लागतं. यानंतर ‘Verify HUID’ या पर्यायावर क्लिक करून, दागिन्यावर कोरलेला HUID नंबर टाका. लगेचच त्या दागिन्याची सगळी माहिती जसे की ज्वेलरचं नाव, नोंदणी क्रमांक, हॉलमार्किंग सेंटर, दिनांक आणि शुद्धतेचा दर्जा दिसून येतो.

फक्त सत्यता नव्हे, तक्रारही नोंदवा

BIS अ‍ॅपचा आणखी एक उपयुक्त भाग म्हणजे ‘Complaints’ विभाग. जर एखाद्या विक्रेत्याकडून खोटी माहिती देण्यात आली असेल, किंवा दर्जात त्रुटी असेल, तर या अ‍ॅपद्वारे तुम्ही थेट BIS कडे तक्रार करू शकता. याशिवाय अ‍ॅप ISI मार्क, हॉलमार्क किंवा CRS रजिस्ट्रेशन नंबर असलेल्या कोणत्याही प्रॉडक्टची सत्यता पडताळून सांगतो.

कुठे सापडतो HUID?

HUID नंबर दागिन्यावर अतिशय सूक्ष्म पद्धतीने कोरला जातो. तो BIS च्या चिन्हाजवळ, शुद्धता ग्रेडच्या जवळ दिसतो. तो सापडण्यासाठी थोडं निरीक्षण आवश्यक असतं.

राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.
भाजपच्या धोरणांवर वर्षा गायकवाड यांचा हल्लाबोल
भाजपच्या धोरणांवर वर्षा गायकवाड यांचा हल्लाबोल.