LICच्या पॉलिसीत 815 रुपये गुंतवा आणि 4.57 लाख रुपये मिळवा

LIC | मुलगा किंवा मुलगी 12 वर्षाचे होईपर्यंत या पॉलिसीत पैसे गुंतवता येतात. तुम्ही गुंतवणुकीला सुरुवात कराल तेव्हापासून मूल 25 वर्षाचे होईपर्यंत तुम्हाला प्रीमियम जमा करावा लागतो.

LICच्या पॉलिसीत 815 रुपये गुंतवा आणि 4.57 लाख रुपये मिळवा
एलआयसी पॉलिसी
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: Rohit Dhamnaskar

Jul 06, 2021 | 2:52 PM

मुंबई: सरकारी योजनांपाठोपाठ आपल्याकडे जीवन बीमा निगम अर्थात LIC मधील गुंतवणूक हा सर्वात सुरक्षित पर्याय मानला जातो. देशातील कोट्यवधी लोक खात्रीशीर आणि चांगल्या परताव्यासाठी LICच्या योजनांमध्ये गुंतवणूक करतात. अशा लोकांसाठी LIC Child Money Back पॉलिसी हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. या पॉलिसीत पालक गार्डियन प्रपोजर तर पॉलिसी होल्डर ही मुले असतात. (Know everything about LIC Child Money Back policy)

मुलगा किंवा मुलगी 12 वर्षाचे होईपर्यंत या पॉलिसीत पैसे गुंतवता येतात. तुम्ही गुंतवणुकीला सुरुवात कराल तेव्हापासून मूल 25 वर्षाचे होईपर्यंत तुम्हाला प्रीमियम जमा करावा लागतो. समजा तुमचा मुलगा किंवा मुलगी 0 ते 13 वयोगटातील असतील तर पॉलिसी टर्म आणि प्रीमियम पेईंग टर्म एकच असते. तुमचा पाल्य 25 वर्षांचा झाल्यानंतर ही पॉलिसी मॅच्युअर होते. या पॉलिसी अंतर्गत तुमचा पाल्य 18 वर्षांचा होईल तेव्हा 20 टक्के कॅशबॅक मिळते. 20 वर्षाचा झाल्यानंतर दुसऱ्यांदा कॅशबॅक मिळते.

या पॉलिसीची मिनिमम सम अश्योर्ड एक लाख इतकी आहे. कमाल सम अश्योर्डची कोणतीही मर्यादा नाही. तुमचा पाल्य आठ वर्षांपेक्षा जास्त वयाचा असेल तर पॉलिसी घेतल्यानंतर रिस्क कव्हरेजचा लाभही सुरु होतो.

या पॉलिसीत प्रीमियम वेव्ह रायडर आहे. पॉलिसी सुरु असताना प्रपोजरचा मृत्यू झाला तर पुढील प्रीमियम भरण्याची गरज नसते. मात्र, पॉलिसीधारकाला संपूर्ण रक्कम मिळते. तसेच या पॉलिसीत गुंतवणुक करणाऱ्यांना सेक्शन 80 सी अंतर्गत सूट मिळते.

तुमचा पाल्य दोन वर्षांचा असताना तुम्ही या योजनेत गुंतवणूक सुरु केली तर प्रीमियम पेईंग टर्म 23 वर्षांची असेल. या पॉलिसीचा मासिक हप्ता 735, त्रैमासिक हप्ता 2203 रुपये, सहामाही हप्ता 4359 आणि वार्षिक प्रीमियम 8624 रुपये इतका आहे. रायडर सहित मासिक हप्ता 815 रुपये इतका आहे. या हिशेबाने 22 वर्षांमध्ये2.25 लाख रुपये जमा होतात.

पॉलिसीत नमूद केल्यानुसार पाल्य 18,20 आणि 22 वर्षांचा झाल्यावर त्याला सम अश्योर्डच्या 20 टक्के म्हणजे 40 हजार रुपये परत मिळतात. 25 वर्ष पूर्ण झाल्यावर उर्वरित 40 टक्क म्हणजे 80 हजार रुपये मिळतील. तसेच 50 हजार अतिरिक्त बोनसही दिला जाईल. तुम्हाला सर्व रक्कम एकत्रित हवी असेल तर मॅच्युरिटीवेळी 4.57 लाख रुपये मिळतील.

संबंधित बातम्या:

LIC च्या ‘या’ पॉलिसीत 150 रुपये गुंतवत राहा; नोकरीला लागण्यापूर्वीच तुमचं मूल होईल लखपती

असली की नकली, खरा हिरा कसा ओळखायचा? सोप्या टिप्स

Income Tax Return: इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करताय, करसवलत मिळवण्यासाठी काय करायचं? वाचा सविस्तर

(Know everything about LIC Child Money Back policy)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें