UPI Pay Now : परदेशात ही युपीआयचा डंका! UPI-PayNow चा कसा होईल वापर

UPI Pay Now : भारताची युपीआय पेमेंट पद्धती आता लवकरच जगभरात डंका वाजविण्यास सज्ज झाली आहे. मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सिंगापूरच्या पंतप्रधानांच्या उपस्थितीत सिंगापूरसाठी युपीआयची सेवा सुरु झाली आहे.

UPI Pay Now : परदेशात ही युपीआयचा डंका! UPI-PayNow चा कसा होईल वापर
Follow us
| Updated on: Feb 21, 2023 | 10:01 PM

नवी दिल्ली : भारताच्या पेमेंट इकोसिस्टमचे जग चाहते झाले आहे. आज नवीन युगाची नांदी झाली. भारतीय युपीआयचा डंका जगात वाजला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि सिंगापूरचे पंतप्रधान ली सीन लूंग यांनी व्हिडिओ कॉन्फरसिन्गच्या माध्यमातून या सेवेचा श्रीगणेशा केला. भारताचे युपीआय (UPI) आणि सिंगापूरचे पेनाऊ (PayNow) या दोन ऑनलाईन पेमेंट पद्धतीचे लिकिंग झाले. आता भारतीय सिंगापूर या देशातही युपीआयच्या माध्यमातून व्यवहार पूर्ण करु शकतील. केंद्र सरकार देशात पेमेंट इकोसिस्टम मजबूत करण्यासाठी पाऊल टाकत आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर युपीआयला प्राधान्य देण्यासाठी केंद्र सरकार त्याला गतीमान करत आहे. त्याचाच हा टप्पा मानण्यात येत आहे. भारतीय युपीआय पद्धत, गुगल पे, फोन पे, पेटीएम आणि इतर डिजिटल पेमेंट्स ॲपच्या माध्यमातून सहज, सोप्या आणि जलदरित्या नागरिकांना व्यवहार पूर्ण करण्यास मदत करते. त्यासाठी काही स्टेप फॉलो कराव्या लागतील.

UPI म्हणजे युनिफाईट पेमेंट्स इंटरफेस एक जलद पेमेंट सेवा आहे. ही सेवा मोबाईल क्रमाकांच्या माध्यमातून काही सेकंदातच एका खात्यातून दुसऱ्या खात्यात पेमेंट ट्रान्सफर करते. भारतीय राष्ट्रीय देयके मंडळाने (NPCI) ही पेमेंट पद्धत विकसीत केली आहे. व्हर्चुअल पेमेंट ॲड्रेस (VPA) या माध्यमातून बँक खात्याचा तपशील देण्याची गरज नसते. त्यामुळे ही पद्धत सुरक्षित मानण्यात येते.

युपीआय व्यक्ती ते व्यक्ती (P2P) आणि व्यक्ती ते व्यापारी (P2M) यांच्यादरम्यान व्यवहारांना परवानगी देते. UPI प्रमाणेच सिंगापूरच्या Pay Now सेवा देते. वापरकर्त्याच्या मोबाईल क्रमांकावरुन एका बँक अथवा ई-वॉलेट खात्यातून दुसऱ्या खात्यात रक्कम पाठवते अथवा प्राप्त करते. देशातील बँका आणि खासगी वित्तीय संस्थांच्या माध्यमातून पेनाऊ व्यवहार पूर्ण करते.

हे सुद्धा वाचा

या सुविधाचा फायदा प्रवासी भारतीय, विद्यार्थी, व्यावसायिक आणि त्यांच्या कुटुंबियांना प्राधान्याने घेता येईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानुसार, 2022 मध्ये देसात युपीआयच्या माध्यमातून 12,6000 अब्ज रुपयांहून अधिक 74 अब्ज व्यवहार झाले आहेत. या वाढत्या व्यवहारांमुळे देशात विकसीत या पेमेंट पद्धतीवर विश्वास असल्याचे दिसून येत असल्याचा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला.

  1. UPI-Pay Now लिकिंग कसे काम करेल
  2. मोबाईल क्रमांकाआधारे एका पेमेंट खात्यातून दुसऱ्या पेमेंट खात्यात रक्कम हस्तांतरीत होते.
  3. मोबाईल क्रमाकांआधारे आता भारतातून सिंगापूर येथे रक्कम हस्तांतरीत करता येईल.
  4. दोन्ही देशातील नागरिक क्यूआर-कोड आधारीत वा केवळ बँक खात्याशी जोडलेल्या मोबाईल क्रमांकाआधारे रिअल टाईममध्ये पैसे पाठवू शकतील.
  5. यासाठी तुम्हाला काही विशेष पर्याय निवडण्याची गरज भासणार नाही.
  6. जर तुमच्याकडे सिंगापूर येथील वापरकर्त्याचा पेनाऊचा क्यूआर कोड असेल तर पैसे पाठविता येतील.
  7. सिंगापूर भारतासाठी जगातील टॉप-4 बाजारपेठेपैकी एक आहे. याठिकाणी अनेक भारतीय आहेत.

Non Stop LIVE Update
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी.
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?.
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल.
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल.
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला...
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला....
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत.
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.