AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

LIC | एकदाच करा गुंतवणूक आणि आयुष्यभर मिळवा पेन्शन..

LIC | भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या या योजनेत तुम्हाला उतरत्या वयात पेन्शन मिळण्याची सोय होणार आहे. या योजनेविषयी जाणून घेऊयात..

LIC | एकदाच करा गुंतवणूक आणि आयुष्यभर मिळवा पेन्शन..
एलआयसीचा शानदार प्लॅनImage Credit source: सोशल मीडिया
| Updated on: Sep 23, 2022 | 7:01 PM
Share

नवी दिल्ली : भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या (LIC) अनेक योजना लोकप्रिय आहे. भारतीयांचा विश्वास एलआयसीवर आजही कायम आहे. इतर विमा कंपन्यांपेक्षा (Insurance Company) भारतीयांची मोठी गुंतवणूक (Investment) एलआयसीमध्ये आहे. आयुष्याची संध्याकाळ आरामात घालवण्यासाठी एलआयसीने एक जोरदार योजना आणली आहे..

LIC ची सरळ पेन्शन योजना (Saral Pension Scheme) सुरु केली आहे. या योजनेत पॉलिसीधारकाला केवळ एकदाच रक्कम गुंतवावी लागते. ही एक नॉन-लिंक्ड सिंगल प्रिमिअम स्कीम आहे. या योजनेत पॉलिसीधारकाला एकदाच रक्कम भरल्यानंतर जीवनभर पेन्शन मिळत राहते.

विमा नियामक आणि विकासक प्राधिकरणाच्या (IRDAI) धोरणानुसार ही वार्षिक योजना आहे. ती तात्काळ प्रभावाने (Immediate Annuity plan) लागू होते. या योजनेत पॉलिसीधारकासाठी दोन उपलब्ध वार्षिकी पर्यायांपैकी एकाची निवड करण्याची मूभा असते. या योजनेत पॉलिसी खरेदी केल्यानंतर 6 महिन्यात कर्ज घेण्याची तरतूद आहे.

एलआयसी सरळ पेन्शन योजना निवडण्यासाठी दोन पर्याय आहेत. पहिला, लाईफ एन्युईटीसोबत 100 खरेदी मूल्याचा परतावा हा आहे. यामध्ये पती-पत्नी पैकी कोणा एकालाच पेन्शन मिळेल. त्यासाठीची गुंतवणूक करता येईल.

या पर्यायामध्ये एकाच व्यक्तीला योजनेचा लाभ मिळेल. पॉलिसी घेणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्याच्यानंतर त्याने वारस नेमलेल्या व्यक्तीला या योजनेची रक्कम मिळेल.

दुसरा पर्याय हा पती-पत्नासाठी संयुक्तरित्या लाभाचा आहे. पती-पत्नीला संयुक्तरित्या या योजनेत सहभागी होता येते. दोघांपैकी जोही शेवटपर्यंत जीवंत राहील, त्याला योजनेतंर्गत पेन्शनचा लाभ मिळत राहतो.

दुसऱ्या पर्यायात पती-पत्नी पैकी ज्याचा मृत्यू होईल. त्याच्या साथीदाराला लाभ मिळतो. त्यानंतर दुसऱ्या साथीदाराचाही मृत्यू झाल्यास त्यांनी नामनिर्देशीत केलेल्या वारसाला योजनेतंर्गत काही रक्कम मिळते.

ही तात्काळ योजना आहे. म्हणजे पॉलिसी खरेदी केल्यानंतर ती तात्काळ प्रभावाने सुरु होते. पॉलिसी घेतल्याबरोबर तुम्हाला पेन्शन मिळायला सुरुवात होईल. पेन्शनधारकाला ही पेन्शन मासिक, त्रैमासिक, अर्धवार्षिक, वार्षिक कशी घ्यायची ते ठरवावे लागते. जो विकल्प तुम्ही निवडाल, त्याप्रमाणे पेन्शन मिळते.

ही योजना तुम्ही ऑनलाईन अथवा ऑफलाईन पद्धतीने खरेदी करु शकता. www.licindia.in या अधिकृत संकेतस्थळावरुन तुम्हाला पॉलिसी खरेदी करता येईल. कमीत कमी तुम्हाला वार्षिक 12,000 रुपये गुंतवणूक करावी लागेल. पण ही बाब तुमचे वय, हप्त्याचा पर्याय यावर अवलंबून आहे.

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.