AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

June Deadlines : आजच निपटवा ही कामे, पॅन-आधार लिकिंगसह ॲडव्हांस टॅक्सचा करा भरणा

June Deadlines : पॅन-आधार कार्ड जोडणीसह ॲडव्हांस टॅक्सचा भरणा आजच करा. नागरिकांना अनेकदा संधी देण्यात आली. पण यानंतर केंद्र सरकार सवलत देण्याच्या तयारीत नाही.

June Deadlines : आजच निपटवा ही कामे, पॅन-आधार लिकिंगसह ॲडव्हांस टॅक्सचा करा भरणा
| Updated on: Jun 30, 2023 | 1:46 PM
Share

नवी दिल्ली : आज महिन्याचा शेवटचा दिवस आहे. 30 जून ही तारीख तुमच्या लक्षात असेल तर इतर सर्व कामे बाजुला सारुन ही कामे पूर्ण करा. तुम्हाला ही कामे पूर्ण करण्यासाठी आजचाच दिवस आहे. कारण 30 जून नंतर तुम्ही ही कामे पहिल्या इतकी सहज करु शकणार नाहीत. त्यासाठी तु्म्हाला चांगलचा भूर्दंड सहन करावा लागेल. त्याचा थेट परिणाम तुमच्या खिशावर होईल. अनेक कामे अशी आहेत, जी या महिन्याच्या शेवटच्या दिवसा आधी पूर्ण करणे आवश्यक आहे. त्यामुळे पॅन-आधार कार्ड जोडणीसह (Pan Card -Aadhaar Card Linking) ॲडव्हांस टॅक्सचा भरणा आजच करा. कारण उद्यापासून तुमच्या खिशाला त्याचा भूर्दंड सहन करावा लागेल.

पॅन-आधार लिंकिंग पॅन कार्डसोबत आधार कार्ड जोडणी करण्यासाठी आज, 30 जून ही शेवटची तारीख आहे. ही दोन्ही महत्वाची कार्ड लिंक करणे आवश्यक आहे. हे कार्ड जोडले नसतील तर प्राप्तिकर रिटर्न भरण्यात अडचण येऊ शकते. तसेच बँकेतील व्यवहार, शेअर बाजारातील व्यवहारात अडचण येऊ शकते. यापूर्वी पॅन-आधार कार्ड जोडणी करण्याची शेवटची तारीख 31 मार्च होती.

भरावा लागेल दंड इनकम टॅक्स ॲक्ट 1961 अंतर्गत पॅन कार्ड, आधार कार्ड जोडणे बंधनकारक करण्यात आले आहे. आज, 30 जून पर्यंत ही लिंकिंग करणे आवश्यक आहे. यापुढे आता मुदत वाढवून देण्यात येणार नाही. आजच ही जोडणी करुन घ्या. 1 जुलैनंतर 1000 रुपयांचा दंड भरावा लागणार आहे.

बँक लॉकर करार ग्राहकांनी जर बँक लॉकर अग्रिमेंट 31 डिसेंबर 2022 रोजीपूर्वी जमा केले असेल तर त्यांना नवीन लॉकर करार करावा लागेल. RBI ने कोणत्याही प्रकारे नुकसान झाल्यास भरपाईची तरतूद केली आहे. आग लागणे, चोरी होणे अशा स्थितीत ग्राहकांना भरपाई मिळेल. जर ग्राहकांनी या नवीन करारनाम्यावर स्वाक्षरी केली नाही तर लॉकरसंबंधीच्या नवीन नियम लागू होणार नाही. त्यामुळे ग्राहकांना अनेक समस्या, अडचणींचा सामना करावा लागू शकतो.

ॲडव्हांस टॅक्सचा भरणा जर तुम्ही व्यावसायिक अथवा नोकरदार असाल आणि कर 10 हजार रुपयांपेक्षा अधिक असेल तर तुम्हाला हा कर मुदतीत भरावा लागणार आहे. जर तुम्ही योग्य कालावधीत ॲडव्हांस टॅक्सचा भरणा (Advance Tax Payment) नाही केला तर पहिल्या तीन हप्त्यांवर 3% आणि शेवटच्या हप्त्यावर 1% हिशेबाने एकूण आगाऊ करावर व्याज मोजावे लागेल. त्यामुळे खिशावर ताण पडेल. त्यामुळे आजच तुम्ही आगाऊ कर भरणे आवश्यक आहे. मुदतीत कर जमा केला नाही तर प्राप्तिकर खात्याकडून नोटीस येऊ शकते.

राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.
भाजपच्या धोरणांवर वर्षा गायकवाड यांचा हल्लाबोल
भाजपच्या धोरणांवर वर्षा गायकवाड यांचा हल्लाबोल.