Post Office च्या योजनेत 1045 रुपये गुंतवा, मॅच्युरिटीवेळी वारसदाराला 14 लाख रुपये मिळणार

Life Insurance | Whole Life Assurance योजनेत 19 वर्षांपासून ते 55 या वयोगटातील लोकांना गुंतवणूक करता येते. या योजनेत मिनिमम सम अश्योर्ड 10 हजार तर मॅक्सिमम सम अश्योर्ड 10 लाख रुपये इतकी आहे.

Post Office च्या योजनेत 1045 रुपये गुंतवा, मॅच्युरिटीवेळी वारसदाराला 14 लाख रुपये मिळणार
पोस्ट ऑफिसमध्ये 10 वर्षे वयानंतर मुलांच्या नावे उघडा हे खाते

नवी दिल्ली: सध्याच्या अनिश्चिततेच्या वातावरणात प्रत्येक कुटुंबप्रमुखाने भविष्यासाठी तरतूद करणे आवश्यक आहे. त्यामुळे विमा ही काळाची गरज झाली आहे. त्यासाठी लोक अनेक पर्याय शोधत असतात. अशा लोकांसाठी पोस्ट ऑफिसची Gram Suraksha किंवा Whole Life Assurance ही योजना चांगला पर्याय ठरू शकते. ही योजना IRDAI च्या कक्षेत येत नाहीत. तसेच या योजनांवर विमाधारकाला बोनसही मिळतो. ही ग्रामीण टपाल जीवन विमा योजना (RPLI) आहे. 1995 मध्ये विशेषत: ग्रामीण भागातील गरीब लोकांसाठी ही योजना सुरु करण्यात आली होती. (Post office RPLI Gram Suraksha scheme)

Whole Life Assurance योजनेत 19 वर्षांपासून ते 55 या वयोगटातील लोकांना गुंतवणूक करता येते. या योजनेत मिनिमम सम अश्योर्ड 10 हजार तर मॅक्सिमम सम अश्योर्ड 10 लाख रुपये इतकी आहे. चार वर्षांच्या कालावधीनंतर या विमा पॉलिसीवर कर्जही काढता येते. तीन वर्षानंतर पॉलिसी सरेंडर करता येते. तसेच एक लाखाच्या सम अश्योर्डवर 60 हजार इतका बोनस दिला जातो.

किती असेल प्रीमियम रक्कम?

आरपीएलआय योजनेअंतर्गत प्रीमियमच्या रकमेबद्दल ‘A’ या व्यक्तीने Whole Life Assurance योजनेत गुंतवणूक करेल. तो 30 वर्षांचा आहे, त्याने 60 वर्षे प्रीमियम जमा करण्याचा निर्णय घेतलाय. त्यानंतर प्रीमियम पेमेंट टर्म (60-30) 30 वर्षे झाली. त्याची विमा रक्कम 5 लाख रुपये आहे. या प्रकरणात दरमहा प्रीमियमची रक्कम 1045 रुपये असेल. बोनस म्हणून त्याला एकूण 900000 रुपये मिळतील. अशाप्रकारे, त्याची परिपक्वता रक्कम 14 लाख (9 लाखांचा बोनस आणि 5 लाखांची विम्याची रक्कम) झाली.

कशी होते बोनसची गणना ?

बोनसची गणना करणे खूप सोपे आहे. विमा उतरवलेल्या रकमेसाठी ही रक्कम 60 हजार रुपये आहे. त्यानुसार, एक लाखांच्या विम्याच्या रक्कमेवरील बोनस 6000 रुपये झाला. 5 लाखांच्या विम्याच्या रकमेवर वार्षिक बोनस 30 हजार रुपये आहे. A साठी प्रीमियम भरण्याची मुदत 30 वर्षे आहे. या प्रकरणात, बोनसची एकूण रक्कम 30000 * 30 = 900000 रुपये झाली आहे.

संबंधित बातम्या:

फिक्स डिपॉझिटवर ‘या’ 4 बँका देतायत सर्वाधिक व्याज, जाणून घ्या खास ऑफर

PM Vaya Vandana Yojana | फक्त एकदा करा गुंतवणूक, दर महिन्याला मिळेल निश्चित पेन्शन

(Post office RPLI Gram Suraksha scheme)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI