जुलै महिन्यात सरकारी आणि खासगी बँक 15 दिवस बंद राहणार, कामांचं नियोजन करण्यासाठी वाचा सुट्ट्यांची यादी

जुलै महिन्यात सरकारी आणि खासगी सर्व बँकांना 15 दिवस सुट्टी असणार आहे. त्यामुळे या महिन्यात केवळ 15 दिवसच बँका सुरू असतील.

जुलै महिन्यात सरकारी आणि खासगी बँक 15 दिवस बंद राहणार, कामांचं नियोजन करण्यासाठी वाचा सुट्ट्यांची यादी
Follow us
| Updated on: Jun 28, 2021 | 4:15 AM

Bank Holidays July 2021 मुंबई : सध्या बँकेची बहुतांश कामं अॅप किंवा इंटरनेट बँकिंगच्या मदतीने होतात. मात्र, अशीही काही कामं आहेत जी करण्यासाठी तुम्हाला बँकेत जावंच लागतं. तुम्हालाही बँकेत जावं लागेल असं काही काम असेल तर जुलै महिन्यात या कामांचं योग्य नियोजन करणं आवश्यक आहे. कारण जुलै महिन्यात सरकारी आणि खासगी सर्व बँकांना 15 दिवस सुट्टी असणार आहे. त्यामुळे या महिन्यात केवळ 15 दिवसच बँका सुरू असतील (Read List of Bank Holidays of 15 days in July 2021 month).

तुमचा वेळ आणि श्रम वाचण्यासाठी म्हणूनच बँकेत जाण्याचं नियोजन करण्याआधी बँका कधी सुरू आहेत आणि कधी सुट्टी आहे हे पाहणं खूप आवश्यक आहे. यासाठीच बँकांच्या सुट्टी्यांची यादी वाचून घ्या. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (RBI) नियमानुसार, आठवडी सुट्टी आणि विविध सणांच्या सुट्टी असे सर्व दिवस मिळून जुलै 2021 महिन्यात केवळ 15 दिवसच बँका सुरू राहतील. बँक कर्मचाऱ्यांना तब्बल 15 दिवस सुट्टी मिळणार आहे. यामुळे सर्वसामान्यांना आपली बँकेतील कामं या 15 दिवसातच करावी लागणार आहे.

जुलै महिन्यात कोणत्या दिवशी बँकांना सुट्टी

जुलै महिन्यात रथयात्रा, भानु जयंती, बकरी ईद आणि केर पुजेसारख्या अनेक सुट्टी आहेत. जुलै महिन्यातील पहिलीच सुट्टी 4 जुलै रोजी आहे. या दिवशी रविवार आहे. यानंतर 10 आणि 11 जुलै रोजी शनिवार आणि रविवारमुळे बँका बंद असतील. 12 जुलै रोजी रथ यात्रा उत्सव असणार आहे. ओडिशातील सर्वात मोठा उत्सव म्हणून ओळख असलेल्या या रथयात्राच्या दिवशी तेथील सर्व बँका बंद असतात. दुसरीकडे 13 जुलै रोजी भानु जयंतीमुळे सिक्किममधील बँका बंद राहतील.

14 जुलै रोजी दुरुकपा तेस्ची सणामुळे सिक्किममधील बँकांना सुट्टी असेल. 16 जुलैला रहेलामुळे उत्तराखंडमधील बँका बंद असतील. 17 जुलैला खर्ची पुजेमुळे त्रिपुरा आणि मणिपूरमधील बँकांना सुट्टी असेल. 18 जुलै रोजी रविवार असल्यानं देशभरातील बँका बंद राहतील. 19 जुलै रोजी गुरु रिम्पोचे थुंगाकरमुळे (Guru Rimpoche Thungakar) सिक्किममधील बँकांना सुट्टी असेल.

20-21 जुलैला बकरी ईदमुळे बँका बंद

20 जुलै रोजी बकरी ईदची सुट्टी असेल. या दिवशी जम्मू-काश्मीर आणि केरळमध्ये सुट्टी असते. दुसरीकडे देशातील इतर बहुतांश भागात बकरी ईदची सुट्टी 21 जुलै रोजी असते. त्यामुळे या दिवशी त्रिपुरा, गुजरात, कर्नाटक, मध्य प्रदेश, तमिळनाडु, पश्चिम बंगाल, उत्तराखंड, आसाम, तेलंगणा, आंध्र प्रदेश, बिहार, छत्तीसगड, नवी दिल्ली, गोवा आणि झारखंडसारख्या राज्यांमध्ये बँकांना सुट्टी असेल. यानंतर 24 आणि 25 जुलै रोजी आठवडी सुट्टी असल्यानं बँका बंद असतील. 31 जुलै रोजी त्रिपुरामध्ये केरा पूजेमुळे बँका बंद असतील. अशाप्रकारे कोणत्या न कोणत्या प्रकारे देशभरातील बँका तब्बल 15 दिवस बंद असणार आहेत.

हेही वाचा :

कोरोना काळात बँक झाल्या मालामाल; एसबीआयपासून सगळ्याच बँकांची बक्कळ कमाई

या 15 बँका स्वीकारणार ब्लॉकचेन तंत्रज्ञान, जाणून घ्या याबद्दल अधिक माहिती

बँक ऑफ बडोदाची खास योजना, 100 रुपयांत सुरु करा अकाऊंट, उत्त्पन्नवाढीसह करातही सवलत

व्हिडीओ पाहा :

Read List of Bank Holidays of 15 days in July 2021 month

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.