AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

SBI कडून ग्राहकांसाठी नोटीस जारी, बँकिंग सेवा सुरू ठेवण्यासाठी लवकर करा ‘हे’ काम

येत्या 30 सप्टेंबरपर्यंत बँकेने खातेदारांना पॅन-आधार कार्ड (पॅन-आधार) लिंक करण्यासाठीची सूचना देण्यात आली आहे. (SBI customers to link their PAN with Aadhaar to avoid any inconvenience)

SBI कडून ग्राहकांसाठी नोटीस जारी, बँकिंग सेवा सुरू ठेवण्यासाठी लवकर करा 'हे' काम
स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये नोकरीची उत्तम संधी
| Edited By: | Updated on: Jul 19, 2021 | 11:34 AM
Share

मुंबई : स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) आपल्या सर्व ग्राहकांना नोटीस बजावली आहे. येत्या 30 सप्टेंबरपर्यंत बँकेने खातेदारांना पॅन-आधार कार्ड (पॅन-आधार) लिंक करण्यासाठीची सूचना देण्यात आली आहे. तसेच जे कोणी ग्राहक पॅन आणि आधार कार्ड लिंक करणार नाहीत, त्यांना भविष्यात मोठ्या अडचणींचा सामना करावा लागू शकतो.

एसबीआयच्या अधिकृत वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, आम्ही आमच्या ग्राहकांना कोणत्याही प्रकारची गैरसोय टाळण्यासाठी पॅन आणि आधार कार्ड लिंक करण्याचा सल्ला देतो. जेणेकरुन त्यांना अखंडित बँकिंग सेवेचा आनंद घेता येईल.

30 सप्टेंबरपर्यंत पॅन-आधारकार्ड लिंक करता येणार

जर तुम्हाला बँकेच्या सेवांचा कोणत्याही अडचणीशिवाय लाभ घ्यायचा असेल तर पॅन आणि आधार कार्ड लिंक करुन घ्यावं. पॅन आणि आधार कार्ड लिंक करणं आवश्यक आहे. पॅन आणि आधार कार्ड लिंक केलं नाही तर अकाऊंट बंद होऊ शकते. तुम्हाला कोणताही व्यवहार करता येणार नाही. त्यामुळे येत्या 30 सप्टेंबरपूर्वी पॅन आधार लिकं करुन घ्या, असे बँकेच्या नोटीसमध्ये म्हटले आहे.

पॅनकार्ड कसे जोडाल आधार कार्डशी?

– आयकर विभागाच्या अधिकृत वेबसाइट incometaxindiaefiling.gov.in वर लॉगिन करा.

– इथे तुम्हाला आधार लिंक करण्याचा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा.

– त्यानंतर तुमचा पॅन नंबर, आधार क्रमांक, तुमचे नाव खाली असलेल्या बॉक्समध्ये भरा.

– यानंतर कॅप्चा कोड काळजीपूर्वक पाहा आणि बॉक्समध्ये भरा.

– सर्व माहिती भरल्यानंतर आधारशी लिंक अशा पर्यायावर क्लिक करा.

पॅन कार्डसह आधारला कसे लिंक कराल?

पॅनशी आधार जोडण्याची प्रक्रिया ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही प्रकारे करता येते. आपण इच्छित असल्यास आपण एसएमएसद्वारे पॅन आणि आधार देखील लिंक करू शकता. यासाठी आपल्याला UIDPAN <SPACE>12 अंकी आधार क्रमांक> <SPACE> <10 अंकी PAN> लिहून 567678 नंबरवर किंवा 56161 वर मेसेज पाठवावा.

असे करा ऑफलाईन लिंक

पॅन सेवा प्रदाता, NSDL या UTIITSLच्या सर्विस सेंटरवर जाऊन पॅन आणि आधार लिंक केले जाऊ शकते. त्यासाठी ‘Annexure-I’ फॉर्म भरावा लागेल आणि पॅन कार्ड आणि आधार कार्डची प्रत सोबत घ्यावी लागेल. ही प्रक्रिया विनामूल्य नाही. यासाठी तुम्हाला निश्चित फी भरावी लागेल. लिंक करताना पॅन किंवा आधार तपशिलात सुधारणा करण्यात आली की नाही यावर ही फी अवलंबून असेल.

(SBI customers to link their PAN with Aadhaar to avoid any inconvenience)

संबंधित बातम्या : 

एखाद्याच्या मृत्यूनंतर आधार कार्ड, पॅनकार्डसह इतर अत्यावश्यक ओळखपत्रांचे काय करायचं? जाणून घ्या

20 वर्षांनंतर दर महिना 1.5 लाख रुपये कमवायचेत? जाणून घ्या किती गुंतवणूक करणं गरजेचं

SBI च्या 44 कोटी ग्राहकांसाठी चांगली बातमी, बँक घरी 20000 रुपयांपर्यंत रोकड पाठवणार, पण कशी?

Follow Us
पंतप्रधान मोदींकडून राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली अर्पण
Independence Day 2026 | पंतप्रधान मोदींकडून राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली अर्पण
स्वप्न मोठी असतील तर आपलं सामर्थ्यही वाढतं - पंतप्रधान मोदी
PM Narendra Modi : स्वप्न मोठी असतील तर आपलं सामर्थ्यही वाढतं, पंतप्रधान मोदींकडून भारताच्या प्रगतीवर भर
Burger King च्या पुणे आउटलेटला मोठा झटका! FDA ने परवानाच रद्द केला
Burger King च्या पुणे आउटलेटला मोठा झटका! FDA ने परवाना रद्द केला, नेमकं कारण काय?
काँग्रेसने लोकशाहीचा मुडदा पाडला; राहुल गांधींवर एकनाथ शिंदेंचा घणाघात
Eknath shinde | काँग्रेसने लोकशाहीचा मुडदा पाडला; राहुल गांधींवर एकनाथ शिंदेंचा घणाघात, 45 सरकारांचा दाखला देत म्हणाले...
शेताला साडी नेसवली अन् रानडुकरांना पळवलं! शेतकऱ्यांची भन्नाट शक्कल
Nagpur Farmer | शेताला साडी नेसवली अन् रानडुकरांना पळवलं! नागपूरच्या शेतकऱ्यांची भन्नाट शक्कल चर्चेत, व्हिडिओ होतोय व्हायरल
राहुल गांधींच्या मिमिक्रीने नवा वाद! मिठ्या मारणं म्हणजे...
Rahul Gandhi | राहुल गांधींच्या मिमिक्रीने नवा वाद! मिठ्या मारणं म्हणजे परराष्ट्र धोरण नाही म्हणत मोदींवर निशाणा
शिवसेना तालुकाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी? ऑडिओ व्हायरल
तू तेव्हा वाचला आहेस, आता वाचणार नाहीस! शिवसेना तालुकाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी? ऑडिओ व्हायरल
केळेवाडी ते चर्नी रोड पूल कधी होणार? मनसेचा प्रशासनाला सवाल
MNS Protest | केळेवाडी ते चर्नी रोड पूल कधी होणार? मनसेचा प्रशासनाला सवाल; आंदोलन पेटलं
हातात बंदुका, आता रॅम्पवर कॅटवॉक! नक्षलवाद्यांचा भन्नाट नवा अवतार बघाच
Ramp Walk | हातात बंदुका, आता रॅम्पवर कॅटवॉक! आत्मसमर्पित महिला नक्षलवाद्यांचा भन्नाट नवा अवतार बघाच
Jalna Triple S City! मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा प्लॅन....
Jalna Triple S City! मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा प्लॅन; रेशीम उद्योगाला मिळणार नवी झेप