AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चेक पेमेंट रोखण्यासाठी आता बँकेत फेऱ्या माराव्या लागणार नाहीत; SBI बँकेची खास सुविधा

SBI Cheque payment | एसबीआयच्या योनो अ‍ॅपवरुन तुम्ही चेक पेमेंट रोखण्यासाठी रिक्वेस्ट टाकू शकता. त्यासाठी अ‍ॅपमधील रिक्वेस्ट पर्यायावर क्लिक करुन चेक बुक आणि स्टॉप चेक हे पर्याय निवडावे लागतील.

चेक पेमेंट रोखण्यासाठी आता बँकेत फेऱ्या माराव्या लागणार नाहीत; SBI बँकेची खास सुविधा
| Edited By: | Updated on: Jun 20, 2021 | 12:31 PM
Share

मुंबई: स्टेट बॅक ऑफ इंडियातील ग्राहकांना आता चेक पेमेंट रोखायचे असल्यास खास सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. त्यामुळे तुम्हाला आता चेक पेमेंट रोखण्यासाठी बँकेच्या शाखेत फेऱ्या माराव्या लागणार नाहीत. अ‍ॅपच्या माध्यमातून रिक्वेस्ट पाठवून तुम्ही चेके पेमेंट रोखू शकता. मात्र, त्यासाठी तुमचा मोबाईल नंबर बँकेकडे नोंदवलेला असला पाहिजे. (SBI offer easy options to stop payment of cheque online know easy process)

इंटरनेट बँकिंगच्या साहाय्याने चेक पेमेंट कसे रोखाल?

* प्रथम onlinesbi.com या संकेतस्थळावर लॉग इन करा. * ई सर्व्हिसेसमधील स्टॉप चेक पेमेंट पर्याय निवडा. * तुमच्या चेकबुकचे खातेक्रमांक सिलेक्ट करा. * त्यानंतर तुम्हाला स्टार्ट चेक नंबर आणि एंड चेक नंबरची विचारणा केली जाईल. * चेक कोणत्या प्रकाराच आहे तो पर्याय क्लिक करावा. * चेक पेमेंट थांबवण्याचे कारण नमूद करावे. * यासाठी तुमच्याकडून आकारण्यात येणारे शुल्क स्क्रीनवर दिसेल. हे पैसे तुमच्या खात्यामधून वळते केले जातील. * त्यानंतर सबमिट बटणावर क्लिक करावे. * ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला बँकेकडून सर्व तपशील असलेला एक मेसेज येईल.

SBI योनो अ‍ॅपवरुन चेके पेमेंट कसे थांबवाल?

एसबीआयच्या योनो अ‍ॅपवरुन तुम्ही चेक पेमेंट रोखण्यासाठी रिक्वेस्ट टाकू शकता. त्यासाठी अ‍ॅपमधील रिक्वेस्ट पर्यायावर क्लिक करुन चेक बुक आणि स्टॉप चेक हे पर्याय निवडावे लागतील. त्यानंतर ड्रॉपडाऊन मेन्यूत जाऊन अकाऊंट नंबर निवडावा. त्यानंतर तुम्हाला स्टार्ट चेक नंबर आणि एंड चेक नंबरची विचारणा केली जाईल. नंतर चेक पेमेंट थांबवण्याचे कारण नमूद करावे. त्यानंतर रिक्वेस्ट सबमिट केल्यानंतर तुमच्या मोबाईलवर ओटीपी येईल. हा ओटीपी भरल्यानंतर तुमचे चेक पेमेंट थांबवले जाईल.

संबंधित बातम्या:

Home Loan : गृहकर्ज घ्यायचय, मग ‘या’ गोष्टी नक्की तपासून घ्या

Swiss bank मधील भारतीयांच्या वाढत्या पैशांचं वृत्त केंद्र सरकारने फेटाळलं, बँकेकडे पुरावे मागितले

SBI ग्राहक सेवा केंद्र सुरु करा आणि बसल्या जागी हजारो रुपये कमवा

(SBI offer easy options to stop payment of cheque online know easy process)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.