AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

SBI ग्राहक सेवा केंद्र सुरु करा आणि बसल्या जागी हजारो रुपये कमवा

SBI | ग्रामीण भागात किंवा दुर्गम ठिकाणी अशाप्रकारची ग्राहक सेवा केंद्रे खूपच फायदेशीर ठरतात. कोणीही ग्राहक सेवा केंद्र सुरु करु शकतो. या माध्यमातून बऱ्यापैकी अर्थार्जनही होते. ग्राहक सेवा केंद्र सुरु करण्यासाठी तुम्हाला बँकेकडून आवश्यक परवानग्या घ्याव्या लागतात.

SBI ग्राहक सेवा केंद्र सुरु करा आणि बसल्या जागी हजारो रुपये कमवा
| Edited By: Rohit Dhamnaskar | Updated on: Jun 20, 2021 | 11:21 AM
Share

मुंबई: भारतीय स्टेट बँकेकडून आपल्या ग्राहकांना प्रत्यक्ष शाखा, ऑनलाईन आणि डिजिटल अ‍ॅप्लिकेशन अशा विविध माध्यमातून सेवा पुरवल्या जातात. आजघडीला एसबीआय (SBI) ही देशात सर्वाधिक शाखा असणाऱ्या बँकांपैकी एक आहे. जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी SBIकडून अनेक ठिकाणी ग्राहक सेवा केंद्र (Custome Service Point) तयार करण्यात आली आहेत. याठिकाणी तुम्हाला पैसे जमा करणे किंवा खाते उघडणे यासारख्या सेवा दिल्या जातात. (How to start SBI Bank Custome Service Point )

ग्रामीण भागात किंवा दुर्गम ठिकाणी अशाप्रकारची ग्राहक सेवा केंद्रे खूपच फायदेशीर ठरतात. कोणीही ग्राहक सेवा केंद्र सुरु करु शकतो. या माध्यमातून बऱ्यापैकी अर्थार्जनही होते. ग्राहक सेवा केंद्र सुरु करण्यासाठी तुम्हाला बँकेकडून आवश्यक परवानग्या घ्याव्या लागतात.

ग्राहक सेवा केंद्र कोणती व्यक्ती चालवू शकते?

एसबीआय बँकेचे नियम आणि कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर कोणतीही व्यक्ती ग्राहक सेवा केंद्र सुरु करु शकते. ग्राहक सेवा केंद्र करण्यासाठी तुम्हाला प्रथम बँकेशी संपर्क करावा लागेल.

ग्राहक सेवा केंद्र कशाप्रकारे सुरु कराल?

SBI चे ग्राहक सेवा केंद्र सुरु करण्यासाठी क्षेत्रीय व्यवसाय कार्यालयात (RBO) अर्ज सादर करावा लागतो. https://bank.sbi/portal/web/home/branch-locator या पोर्टवरुन तुमच्या परिसरातील RBO चा पत्ता मिळेल. याशिवाय, तुम्ही जवळच्या शाखेतूनही हा पत्ता मिळवू शकता. काही खासगी कंपन्यांच्या माध्यमातूनही SBI चे ग्राहक सेवा केंद्र सुरु करण्यासाठी मदत केली जाते. मात्र, काहीवेळा याठिकाणी फसगत होण्याची शक्यता असते. त्यामुळे आपल्या माहितीचा स्रोत नीटपणे तपासावा.

संबंधित बातम्या:

Home Loan : गृहकर्ज घ्यायचय, मग ‘या’ गोष्टी नक्की तपासून घ्या

Swiss bank मधील भारतीयांच्या वाढत्या पैशांचं वृत्त केंद्र सरकारने फेटाळलं, बँकेकडे पुरावे मागितले

Fathers Day : ‘फादर्स डे’ला वडिलांना आरोग्य विमा भेट द्या, 5 मोठे लाभ मिळवा

(How to start SBI Bank Custome Service Point )

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली