AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Indian Railway : इतिहासात पहिल्यांदाच असे घडणार, स्थलांतरीत मजूरांसाठी स्पेशल ट्रेन धावणार!

Indian Railway : इतिहासात पहिल्यांदाच असे घडणार आहे. स्थलांतरीत मजूरांसाठी स्पेशल ट्रेन धावणार आहे. अर्थात याचा फायदा उत्तरेतील राज्यांना अधिक होईल. पण इतर ट्रेनवरील भार कमी होईल. काय आहे ही योजना, कधी धावणार ही ट्रेन

Indian Railway : इतिहासात पहिल्यांदाच असे घडणार, स्थलांतरीत मजूरांसाठी स्पेशल ट्रेन धावणार!
| Updated on: Jul 20, 2023 | 4:55 PM
Share

नवी दिल्ली | 20 जुलै 2023 : रेल्वे बोर्ड देशभरातील स्थलांतरीत मजूरांची (Migrant Workers) आणि कर्मचाऱ्यांची खास सोय करणार आहे. या समूहासाठी स्वतंत्र रेल्वेची व्यवस्था करण्यात येणार आहे. ही रेल्वे नॉन-एसी, जनरल कॅटेगिरीची ट्रेन सुरु करण्यात येणार आहे. या निर्णयाचा अर्थातच उत्तरेतील राज्यांना मोठा फायदा होईल. या राज्यातील प्रवाशांची यामुळे लांबलचक वेटिंग लिस्टपासून सूटका होईल. तर इतर राज्यातील प्रवाशांना सणासुदीच्या काळात पर्यटनाचा आनंद लुटता येईल. सणासुदीच्या काळात रेल्वेवरील ताण यामुळे कमी होईल. कोरोनानंतर मंजूरांना घरी पोहचविण्यात रेल्वेने (Indian Railway) मोठी भूमिका निभावली होती. यापासून धडा घेत आता ही खास योजना आखण्यात येत आहे.

कधी लागणार मुहूर्त

ही रेल्वे जानेवारी 2024 पासून धावेल. नवीन रेल्वे ही नॉन एसी एलएचबी कोच असेल. या रेल्वेत केवळ स्लीपर आणि जनरल कॅटेगिरी असेल. या रेल्वेचे नाव अजून निश्चित करण्यात आलेले नाही. यापूर्वी कोरोना काळात भारतीय रेल्वेने कर्मचारी, मजूरांसाठी सेवा बजावली होती. त्यांना गंतव्य स्थानापर्यंत पोहचवले होते.

इतक्या राज्यात धावेल रेल्वे

रेल्वे बोर्डानुसार, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, छत्तीसगड, उडीसा, पश्चिम बंगाल, पंजाब, आसाम, गुजरात, दिल्ली, तामिळनाडू, महाराष्ट्र, आंध्र प्रदेशासह इतर राज्यात या नवीन रेल्वे धावतील. उत्तर भारत, विशेषतः बिहार, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, उडीसा, आसाम या राज्यातून मजूर, कुशल, अकुशल कामगार, कारागिर, कर्मचारी, अधिकारी वर्ग गुजरात, महाराष्ट्र, गोवा या राज्यात मोठ्या प्रमाणावर स्थलांतरीत होतो. काही जण रोजगार शोधण्यासाठी आंध्र प्रदेश, कर्नाटकपर्यंत जातात.

अनेक रेल्वे धावतील

या स्थलांतरीत मजूरांसाठी खास ट्रेन चालविण्यात येणार आहे. यामध्ये स्लीपर आणि जनरल क्लास असेल. या मायग्रेंट स्पेशल ट्रेनमध्ये कमीत कमी 22 आणि जास्तीत जास्त 26 कोच असतील. विशेष म्हणजे ही ट्रेन वर्षभर सुरु राहील. त्यामुळे मजूरांना आता तिकिटासाठी खटपट करावी लागणार नाही. तसेच उभं राहून प्रवास करावा लागणार नाही. त्यांना जागा मिळेल.

सर्वसमावेशक टाईमटेबल

या रेल्वे नियमीत टाईमटेबलमध्ये असतील. त्यामुळे प्रवाशांना या रेल्वेत अगोदरच सीट बूक करता येईल. आरक्षित करता येईल. सध्या या रेल्वेत दोन प्रकारचे कोच असतील. एलएचबी कोच आणि वंदे भारत कोच सेवा असतील. सध्या एकूण 28 प्रकारचे कोच सर्व्हिसमध्ये आहेत. या रेल्वेचे तिकीट स्वस्त असतील. आता जनरल डब्ब्यातील प्रवाशांसाठी स्वस्ता भोजणाची योजना पण सुरु करण्यात आली आहे.

राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.
भाजपच्या धोरणांवर वर्षा गायकवाड यांचा हल्लाबोल
भाजपच्या धोरणांवर वर्षा गायकवाड यांचा हल्लाबोल.