Mutual Fund : एकदम बेस्ट SIP! केवळ 100 रुपयांच्या गुंतवणुकीवर व्हा कोट्यधीश

Mutual Fund : अवघ्या 100 रुपयाच्या गुंतवणुकीपासून सुरुवात केली असता, त्याला Micro SIP म्हणतात. थेंबे थेंबे तळे साचे असे म्हणतात. या योजनांमध्ये गुंतवणूकदारांना पॅन कार्डचा वापर न करताही गुंतवणूक करता येते, हे विशेष. पण त्यासाठी दोन अटींचे पालन करावे लागते.

Mutual Fund : एकदम बेस्ट SIP! केवळ 100 रुपयांच्या गुंतवणुकीवर व्हा कोट्यधीश
Follow us
| Updated on: Feb 22, 2023 | 4:50 PM

नवी दिल्ली : दर महिन्याला केवळ 100 रुपयांची अल्पबचत (Small Savings) तुम्हाला कोट्यधीश बनवू शकते. पण त्यासाठी तुम्हाला दीर्घकाळ गुंतवणुकीचा मंत्र जपावा लागेल. दर महिन्याला 100 रुपयांची Micro-SIP कराल तर एका वर्षात तुम्ही 1200 रुपये जमा कराल. आता तुमच्या वयानुसार या योजनेत गुंतवणुकीची योजना आखा. या योजनेत तुम्हाला कोणताही वेगळा निधी जमाविण्याची आवश्यकता नाही. केवळ 100 रुपयांची अल्पबचत करावी लागेल. तुम्ही 20 वर्षांपर्यंत गुंतवणूक केल्यास 24,000 रुपये जमा होतील. दरवर्षी या रक्कमेवर 12% अंदाजे परतावा गृहित धरल्यास 98,925 रुपयांचा फंड तयार होतो. अजून 30 वर्षे गुंतवणूक केल्यास फंडात जवळपास 3.5 लाख रुपये जमा होतील. 50 वर्षांत 39 लाख रुपये जमा होतील.

पद्धतशीर गुंतवणूक योजना (SIP) प्रचंड लोकप्रिय आहेत. पण तुम्ही अवघ्या 100 रुपयांनी गुंतवणूक केल्यास त्याला Micro SIP असे म्हणतात. म्युच्युअल फंड नियामक संस्था, सेबीने (SEBI) मायक्रो एसआयपीमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी KYC नियम सोपे केले आहेत. या योजनांमध्ये गुंतवणुकीसाठी पॅनकार्डची आवश्यकता नाही. पण त्यासाठी दोन नियमांचे पालन करावे लागते. या योजनांमध्ये वार्षिक 50,000 रुपयांपेक्षा अधिकची गुंतवणूक करता येते नाही. तुम्हाला ओळखपत्र द्यावे लागते.

मायक्रो एसआयपीसाठी पॅन वा KYC (Know your customer) कागदपत्रांची आवश्यकता नसते. तुमच्याकडे ओळखपत्राची फोटोकॉपी, मतदान ओळखपत्र, वाहन परवाना ही कागदपत्रे मात्र लागतात. या कागदपत्रांच्या पडताळ्यासाठी मूळ कागदपत्रे दाखवावी लागतात. अजून इतर कोणती कागदपत्रे लागतात, याची माहिती अॅसेट मॅनेजमेंट कंपन्याकडून मिळते.

हे सुद्धा वाचा

तुम्ही ओळखपत्र आणि इतर जी कागदपत्रे देत आहात. ती खरी असायला हवीत. गुंतवणूकदारांना फोटोकॉपीवर स्वाक्षरी करावी लागते. कागदपत्रांच्या साक्षांकित प्रतिसाठी या कागदपत्रांवर ARN धारकाची स्वाक्षरी आवश्यक आहे. ही व्यक्ती AMFI मध्ये म्युच्युअल फंड वितरक म्हणून नोंदणीकृत असायला हवी.

मायक्रो एसआयपी वैयक्तिक, एनआरआय, नाबालिक सुरु करु शकतो. त्यासाठी त्याचे नावे खाते सुरु करता येते. मायक्रो एसआयपीसाठी अविभक्त हिंदू कुटुंबियांना संस्थागत गुंतवणूकदारांना मिळणारी सवलत मिळत नाही. मायक्रो एसआयपीमध्ये गुंतवणूकदारांना एक रक्कमी गुंतवणूक करता येते नाही. एका आर्थिक वर्षात 50,000 रुपयांपेक्षा कमी गुंतवणूक करता येत नाही. या लघू एसआयपीमध्ये गुंतवणूकदारांना एका वर्षांत 50,000 रुपयांपेक्षा अधिकची गुंतवणूक करता येत नाही. तुम्ही एकापेक्षा जास्त मायक्रो एसआयपी सुरु करु शकता.

ही योजनेत जितक्या लवकर गुंतवणूक सुरु कराल, तेवढा तुमचा फायदा होईल. या योजनेत केलेली अल्पबचत तुम्हाला दीर्घकाळासाठी मोठा निधी उपलब्ध करेल. कमी वयात सुरु केलेली बचत तुम्हाला निवृत्तीवेळी खूप मोठा निधी देईल. ही या एसआयपीची जादू आहे. तुम्ही या योजनेत अगदी कमी बचतीत कोट्यधीश होऊ शकतात. तुम्ही चुकीची कागदपत्रे जोडल्यास तुमची एसआयपी रद्द होऊ शकते.

Non Stop LIVE Update
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?.
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले.
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?.
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?.
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?.
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?.
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?.
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला.
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका.
आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली, अजितदादांचा निशाणा कुणावर?
आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली, अजितदादांचा निशाणा कुणावर?.