पीएफ खात्यात व्याजाचे पैसे कधी येणार? ईपीएफओने दिली ही महत्त्वपूर्ण माहिती

देशातील कोट्यवधी कर्मचारी त्यांच्या भविष्यासाठी भविष्य निर्वाह निधीवर अवलंबून आहेत. ईपीएफओचे हे पैसे या कर्मचाऱ्यांच्या वेतनातून दरमहा पीएफ खात्यात जमा केले जातात. जर तुम्हाला देखील काही मिनिटांत पीएफमध्ये जमा झालेले पैसे तपासायचे असतील तर त्याची प्रक्रिया खूप सोपी आहे.

पीएफ खात्यात व्याजाचे पैसे कधी येणार? ईपीएफओने दिली ही महत्त्वपूर्ण माहिती
EPFO subscribers

नवी दिल्ली : कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीवर यंदाच्या वर्षासाठी प्राप्त झालेले व्याज कधीपर्यंत खात्यात जमा होईल, याबाबत कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (ईपीएफओ) माहिती जाहीर केली आहे. याबाबत ट्विटरवर एका युजरने विचारले होते. त्यावर स्पष्टीकरण देताना ईपीएफओने खातेधारकांच्या मनातील संभ्रम दूर केला आहे. सध्याच्या घडीला ईपीएफओकडून भविष्य निर्वाह निधीवर 8.5 टक्के दराने व्याज दिले जात आहे. (This is important information provided by EPFO about interest credit)

व्याजाचे पैसे लवकरच खात्यात जमा होणार

पीएफवरील व्याजाचे पैसे लोकांच्या खात्यात जुलैच्या अखेरीपर्यंत येतील, असे सुरुवातीला ईपीएफओकडून सांगण्यात आले होते. मात्र तसे घडलेले नाही. पीएफ खातेदारांना अजूनही व्याजाची वाट पाहावी लागत आहे. यासंदर्भातही ईपीएफओने स्पष्टीकरण दिले आहे. ईपीएफओकडून सांगण्यात आले आहे की व्याजाचे पैसे जमा करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. याबाबत खातेधारकांना लवकरच अपडेट मिळेल. देशातील कोट्यवधी कर्मचारी त्यांच्या भविष्यासाठी भविष्य निर्वाह निधीवर अवलंबून आहेत. ईपीएफओचे हे पैसे या कर्मचाऱ्यांच्या वेतनातून दरमहा पीएफ खात्यात जमा केले जातात. जर तुम्हाला देखील काही मिनिटांत पीएफमध्ये जमा झालेले पैसे तपासायचे असतील तर त्याची प्रक्रिया खूप सोपी आहे.

एसएमएसद्वारे जाणून घ्या

– जर तुमचा यूएएन नंबर ईपीएफओमध्ये नोंदणीकृत असेल, तर तुमच्या पीएफ खात्यातील जमा रक्कमेची माहिती एसएमएसद्वारे प्राप्त करता येईल.
– यासाठी तुम्हाला EPFOHO UAN ENG (शेवटची तीन अक्षरे भाषेसाठी आहेत) हा मेसेज 7738299899 वर पाठवावा लागेल.
– तुम्हाला तुमच्या पीएफ खात्यातील जमा रक्कमेची माहिती मेसेजद्वारे उपलब्ध होईल.
– जर तुम्हाला हिंदी भाषेत माहिती हवी असेल तर तुम्हाला EPFOHO UAN HIN असे लिहून मेसेज पाठवावा लागेल.
– पीएफ शिल्लक जाणून घेण्यासाठी ही सेवा इंग्रजी, पंजाबी, मराठी, हिंदी, कन्नड, तेलगू, तमिळ, मल्याळम आणि बंगाली या भाषांमध्ये उपलब्ध आहे.
– पीएफ बॅलन्ससाठी तुमचा यूएएन नंबर बँक खाते, पॅन कार्ड आणि आधार कार्डशी (आधार) लिंक केलेला असणे आवश्यक आहे.
– ईपीएफओच्या वेबसाइटवर तुम्ही तुमच्या पासबुकमधील शिल्लक रक्कमेची माहिती तपासू शकता.
– पासबुक पाहण्यासाठी तुमच्याजवळ यूएन नंबर असणे आवश्यक आहे.

मिस्ड कॉलद्वारे जाणून घ्या जमा रक्कम

तुमच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावरून 011-22901406 या क्रमांकावर मिस्ड कॉल द्या. यानंतर तुम्हाला ईपीएफओच्या मॅसेजद्वारे पीएफचा तपशील प्राप्त होईल. इथेही तुमचा यूएएन, पॅन आणि आधार लिंक असणे आवश्यक आहे.

वेबसाइटद्वारे कसे तपासायचे?

– ईपीएफओ वेबसाइटवर लॉग इन करा. नंतर epfindia.gov.in वर ई-पासबुकवर क्लिक करा.
– ई-पासबुकवर क्लिक केल्यावर passbook.epfindia.gov.in वर एक नवीन पेज उघडेल.
– येथे तुम्हाला तुमचा युजरनेम (UAN नंबर), पासवर्ड आणि कॅप्चा भरावा लागेल.
-सर्व तपशील भरल्यानंतर तुम्ही एका नवीन पृष्ठावर येता. येथे तुम्हाला सदस्य आयडी निवडावा लागेल.
– येथील ई-पासबुकवर तुम्हाला तुमचा ईपीएफ बॅलन्स जाणून घेता येईल. (This is important information provided by EPFO about interest credit)

इतर बातम्या

सहा महिने लपवलं आता समोर आलं, करीनाच्या दुसऱ्या मुलाचं नाव माहिती आहे का ?

PHOTO | कर्जदाराचा मृत्यू झाल्यास कर्जाची रक्कम कोण भरते? जाणून घ्या काय आहे नियम

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI