AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सरकारच्या ‘या’ अ‍ॅप्समुळे सरकारी काम आता फक्त एका क्लिकवर!

तुम्ही स्मार्टफोन वापरत असाल, तर आजच ही सरकारी सुपर अ‍ॅप्स डाउनलोड करा आणि डिजिटल भारताचा जबाबदार नागरिक म्हणून पुढे या. कारण ही अ‍ॅप्स केवळ सोयीसाठी नाहीत, तर त्या एक डिजिटल क्रांतीचा महत्त्वाचा भाग आहेत.

सरकारच्या 'या' अ‍ॅप्समुळे सरकारी काम आता फक्त एका क्लिकवर!
मोबाईलमध्ये ठेवा ‘या’ 5 सरकारी सुपर अ‍ॅप्स! आधार, पॅन आणि पासपोर्टसह होतील अनेक कामंImage Credit source: File Photo
| Edited By: | Updated on: Jul 17, 2025 | 6:09 PM
Share

डिजिटल इंडियाच्या युगात स्मार्टफोन आता केवळ मनोरंजनासाठी किंवा कॉल्ससाठी नाही, तर आपल्या दैनंदिन जीवनाच्या अनेक गरजा पूर्ण करण्यासाठी एक महत्त्वाचं साधन बनलं आहे. भारत सरकारने नागरिकांच्या सोयीसाठी काही अशा अ‍ॅप्स तयार केल्या आहेत ज्या तुम्हाला घरबसल्या अनेक सरकारी सेवा वापरण्याची मुभा देतात. तुम्ही जर स्मार्टफोन वापरत असाल, तर तुमच्या फोनमध्ये ही 5 सरकारी अ‍ॅप्स असायलाच हव्यात कारण त्यांच्यामुळे तुमचं आयुष्य सोपं, सुरक्षित आणि पेपरलेस होऊ शकतं. चला पाहूया ही अ‍ॅप्स कोणती आणि त्यांचा उपयोग नेमका कसा आहे.

1. UMANG अ‍ॅप

UMANG म्हणजे Unified Mobile Application for New-age Governance. हे अ‍ॅप म्हणजे सरकारच्या 100 हून अधिक विभागांची 1000 पेक्षा जास्त सेवांचं एकत्रिकरण आहे. यात तुम्ही आधारशी संबंधित सेवा, पासपोर्ट अर्ज, गॅस बुकिंग, वीज आणि पाणी बिल भरणं, पॅन कार्ड, डिजीलॉकर, ई-हॉस्पिटल सेवा, EPFO वगैरे वापरू शकता. या अ‍ॅपचा इंटरफेस अतिशय सोपा असून हे अ‍ॅप मराठीतही उपलब्ध आहे. हे Android आणि iPhone दोन्हीवर मोफत मिळतं.

2. AIS अ‍ॅप

AIS म्हणजे Annual Information Statement अ‍ॅप. हे अ‍ॅप आयकर विभागानं सुरू केलं असून खासकरून इन्कम टॅक्स रिटर्न भरताना किंवा आर्थिक व्यवहार ट्रॅक करताना उपयोगी पडतं. यात तुम्ही बँकेतील व्याज, म्युच्युअल फंड, शेअर व्यवहार, TDS-TCS यांची संपूर्ण माहिती पाहू शकता. हे अ‍ॅप तुमच्या कर भरण्याच्या प्रक्रियेत पारदर्शकता आणि अचूकता ठेवण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे.

3. RBI रिटेल डायरेक्ट अ‍ॅप

भारतीय रिझर्व्ह बँकेचं हे अ‍ॅप सर्वसामान्य लोकांसाठी खास आहे. याच्या मदतीनं तुम्ही सरकारी बॉण्ड, ट्रेझरी बिल, राज्य सरकारची सिक्युरिटीज आणि सॉव्हरेन गोल्ड बॉण्डमध्ये गुंतवणूक करू शकता. पूर्वी अशा गुंतवणुकीसाठी केवळ मोठ्या संस्थांनाच परवानगी होती, पण आता हे अ‍ॅप सर्वांसाठी खुलं आहे. यात खाते उघडणंही पूर्णपणे मोफत आहे आणि Android व iPhone वर सहज उपलब्ध आहे.

4. Digi Yatra अ‍ॅप

जर तुम्ही विमानप्रवास करत असाल, तर Digi Yatra अ‍ॅप तुम्हाला नक्कीच वापरावं लागेल. हे अ‍ॅप भारत सरकारची डिजिटल ओळख वापरून प्रवास सुलभ करण्यासाठी आहे. एकदा रजिस्ट्रेशन केल्यावर तुम्ही फेस रिकग्निशनच्या माध्यमातून चेक-इन, सुरक्षा तपासणी आणि बोर्डिंग करता येतं कोणतेही डॉक्युमेंट दाखवायची गरज नाही. हे सध्या भारतातील 28 एअरपोर्ट्सवर उपलब्ध आहे. आधार आणि ट्रॅव्हल डिटेल्सद्वारे सहज नोंदणी करता येते.

5. Post Info अ‍ॅप

भारत सरकारच्या डाक विभागाचं हे अ‍ॅप तुमच्या सर्व पोस्ट संबंधित गरजा पूर्ण करतं. यातून तुम्ही स्पीड पोस्ट, रजिस्टर्ड पार्सल, ई-मनी ऑर्डर ट्रॅक करू शकता. याशिवाय जवळचं पोस्ट ऑफिस शोधणं, पिनकोड तपासणं, तसेच सुकन्या समृद्धी योजना, आवर्ती ठेव, ज्येष्ठ नागरिक बचत योजना यांचे व्याजदर देखील तपासता येतात. हे अ‍ॅप नागरिकांना डाक सेवांचा डिजिटल आणि सोयीस्कर पर्याय देतं.

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.