तुमची मुलगी होईल करोडपती! फक्त तिच्या जन्मानंतर करा हे काम
मुलीच्या भविष्यासाठी गुंतवणूक करताना ही अत्यंत फायदेशीर आणि सुरक्षित पर्याय आहे. दरवर्षी थोडीशी शिस्तबद्ध बचत केल्यास, तिच्या लग्नाच्या वेळी तुम्ही तिला 1 कोटी रुपये देऊ शकता.

आजच्या काळात आपल्या मुलीचं भविष्य सुरक्षित करणं ही प्रत्येक पालकाची प्राथमिक जबाबदारी असते. त्यातही तिच्या शिक्षणापासून ते लग्नापर्यंतचा खर्च दिवसेंदिवस वाढत चालला आहे. अशा परिस्थितीत जर तुम्हाला तुमच्या मुलीच्या लग्नासाठी तब्बल 1 कोटी रुपये द्यायचे असतील, तर त्यासाठी तिच्या जन्मताच नियोजन सुरू करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. हे शक्य आहे, ते भारत सरकारच्या ‘सुकन्या समृद्धी योजना’ या विश्वासार्ह स्कीममुळे!
काय आहे सुकन्या समृद्धी योजना?
सुकन्या समृद्धी योजना ही केंद्र सरकारची एक स्मॉल सेव्हिंग स्कीम असून ती फक्त मुलींसाठी तयार करण्यात आली आहे. या योजनेत मुलीच्या जन्मानंतर तिच्या १० व्या वर्षीपर्यंत कोणत्याही पोस्ट ऑफिस किंवा अधिकृत बँकेत खाते उघडता येते. या योजनेत गुंतवणूक करणं फक्त सुरक्षितच नसतं, तर ते ब्याजासह करमुक्त देखील असतं.
सुरुवातीपासून बचत केली, तर 1 कोटी रुपये शक्य
जर तुम्ही तुमच्या मुलीच्या जन्मालाच सुकन्या समृद्धी योजना सुरू केली आणि दरवर्षी 1.5 लाख रुपये गुंतवले, तर 15 वर्षे गुंतवणुकीनंतर 8.2% (सध्याची व्याजदर) दराने 21 वर्षांच्या पूर्णतेनंतर तुम्हाला अंदाजे 70 लाख ते 1 कोटी रुपयांपर्यंत रक्कम मिळू शकते. ही रक्कम मुलीच्या शिक्षणासाठी किंवा लग्नासाठी अत्यंत उपयुक्त ठरते. विशेष म्हणजे गुंतवणूक, मिळणारे व्याज आणि अंतिम रक्कम तीनही गोष्टी पूर्णपणे टॅक्स फ्री असतात.
किती गुंतवणूक करता येते?
या योजनेत किमान 250 रुपये आणि कमाल 1.5 लाख रुपये प्रतिवर्ष गुंतवता येतात. गुंतवणूक कालावधी 15 वर्षे आहे, पण खाते 21 वर्षांपर्यंत सुरू राहतं. गुंतवणूक थांबल्यानंतरही रक्कम वरचं व्याज मिळत राहतं.
अशा प्रकारे मिळतो लाभ – उदाहरणासह:
- वर्षभरात गुंतवणूक : ₹1,50,000
- गुंतवणुकीचा कालावधी : 15 वर्ष
- खाते बंद होणार : 21 वर्षानंतर
- अंदाजे मिळणारी रक्कम (8.2% व्याज दरावर) : ₹70 लाख ते ₹1 कोटी
- मुलगी 18 वर्षांची झाल्यावर काही रक्कम काढता येते
योजनेच्या नियमांनुसार, मुलगी 18 वर्षांची झाल्यानंतर, शैक्षणिक कारणास्तव ठराविक अटींसह खात्यातील काही रक्कम काढता येते. ही सुविधा आपत्कालीन शैक्षणिक खर्चासाठी फार उपयुक्त ठरते.
