कार विकायची असेल तर फास्टॅगचे काय होईल? जाणून घ्या काय करावे ते

आपण आपली कार विकल्यास, आपल्याला आपला फास्टॅग बदलावा लागेल, कारण फास्टॅग आपल्या बँक खात्याशी संलग्न असेल. अशा परिस्थितीत आपल्याला आपला फास्टॅग बंद करावा लागेल.

कार विकायची असेल तर फास्टॅगचे काय होईल? जाणून घ्या काय करावे ते
कार विकायची असेल तर फास्टॅगचे काय होईल? जाणून घ्या काय करावे ते
Follow us
| Updated on: Jul 24, 2021 | 3:48 PM

नवी दिल्ली : कारमध्ये फास्टॅग लावणे बंधनकारक झाले आहे. किंबहुना आता फास्टॅग हे रस्ता कर भरण्याचे एक साधन बनले आहे. कारमध्ये फास्टॅग न लावल्यास आपल्याला अनेक अडचणींना तोंड द्यावे लागू शकते. आता एका शहरातून दुसऱ्या शहरात जाणारे बहुतेक लोकांनी आपल्या गाडीवर फास्टॅग लावला आहे. परंतु तुम्हाला काही गोष्टी माहिती असणे फार आवश्यक आहे. ते म्हणजे, फास्टॅग रिचार्ज कसे करावे आणि ते कसे कार्य करते ? तुम्ही कधी विचार केला आहे की जर आपण आपली कार विक्री केली तर या फास्टॅगचे काय होईल? तसेच जर काही कारणास्तव कारची पुढील काच तुटली तर फास्टॅगचे काय होईल? अशा परिस्थितीत फास्टॅगसाठी वेगळी व्यवस्था केली गेली आहे. त्या प्रक्रियेद्वारे तुम्ही या समस्येतून मार्ग काढू शकता. (What happens to Fastag if you want to sell a car, know what to look for and tactics to help ease the way)

आपण कार विकल्यास काय होईल?

आपण आपली कार विकल्यास, आपल्याला आपला फास्टॅग बदलावा लागेल, कारण फास्टॅग आपल्या बँक खात्याशी संलग्न असेल. अशा परिस्थितीत आपल्याला आपला फास्टॅग बंद करावा लागेल. एक गोष्ट लक्षात असू द्या की आपला फास्टॅग हस्तांतरित अर्थात ट्रान्सफर केला जात नाही. तथापि, सध्या काही पेमेंट प्लॅटफॉर्मवर फास्टॅग हस्तांतरीत करण्याचा पर्याय दिला जात आहे. ज्या माध्यमातून वाहन हस्तांतरणासह फास्टॅगदेखील हस्तांतरीत होत आहे. या प्रक्रियेमुळे आपला फास्टॅग दुसऱ्या व्यक्तीच्या खात्याशी जोडणे शक्य होत आहे.

फास्टॅग बंद किंवा हस्तांतरीत कसा करू शकतो?

आपला फास्टॅग बंद करण्यासाठी आपल्याला आपल्या बँक किंवा वॉलेट कंपनीशी संपर्क साधावा लागेल. आपण ग्राहक सेवा केंद्राच्या नंबर्सवर कॉल करून आपण सहजपणे फास्टॅग बंद करू शकतो. आवश्यक असल्यास आपला नवीन टॅग बनवून घेता येईल. याशिवाय पेटीएममध्ये फास्टॅग हस्तांतरीत करण्याचा पर्यायदेखील देण्यात आला आहे. त्याआधारे आपण आपला फास्टॅग इतर कोणत्याही फोन नंबरवर हस्तांतरीत करू शकतो. त्यानंतर फास्टॅग दुसऱ्या नंबरशी संलग्न केला जाईल. आपण पेटीएमच्या अ‍ॅपवरून हे कार्य करू शकतो. फास्टॅग बंद करण्यासाठी आपल्याला ग्राहक सेवा केंद्राशी बोलून घेणे आवश्यक आहे.

काच किंवा टॅग फुटल्यास काय करावे?

जर तुमच्या कारची काच फुटली किंवा टॅग तुटला तर तुम्ही नवीन फास्टॅग मिळवू शकता. यासाठी तुम्हाला बँकेशी संपर्क साधावा लागेल किंवा जेथे फास्टॅग उपलब्ध असेल तेथे तुम्हाला जावे लागेल. तेथे जाऊन तुम्ही नवीन फास्टॅग घेऊ शकता. फास्टॅगकडून हा पर्याय देण्यात आलेला आहे. त्यामुळे आपल्या गाडीची काच फुटली वा या ना त्या कारणामुळे फास्टॅग तुटला तर अशा परिस्थितीत आपल्याला घाबरून जाण्याची गरज नाही, हे लक्षात ठेवा. (What happens to Fastag if you want to sell a car, know what to look for and tactics to help ease the way)

इतर बातम्या

ICSE, ISC Result 2021: आयसीएसई बोर्डाच्या दहावी आणि बारावीचा निकाल जाहीर, निकाल कुठे पाहायचा?

आजवर कोणीही का चढू शकले नाही कैलास पर्वत? जाणून घ्या काय आहेत कारणे

Non Stop LIVE Update
मोदींवरील त्या वक्तव्यावर नवनीत राणांचं स्पष्टीकरण, विरोधकांवर घणाघात
मोदींवरील त्या वक्तव्यावर नवनीत राणांचं स्पष्टीकरण, विरोधकांवर घणाघात.
मशाल आहे की आईस्क्रीमचा..., भाजपच्या बड्या नेत्याची ठाकरे गटाला टोला
मशाल आहे की आईस्क्रीमचा..., भाजपच्या बड्या नेत्याची ठाकरे गटाला टोला.
सासूचे 4 दिवस संपले, आता सूनेचे दिवस...,दादांचा शरद पवारांना खोचक टोला
सासूचे 4 दिवस संपले, आता सूनेचे दिवस...,दादांचा शरद पवारांना खोचक टोला.
गद्दारी करणाऱ्यांना... ओमराजे निंबाळकरांची शिंदेंच्या खासदारावर टीका
गद्दारी करणाऱ्यांना... ओमराजे निंबाळकरांची शिंदेंच्या खासदारावर टीका.
खासदाराच्या प्रचारसभेत आमदाराला आली चक्कर, रुग्णालयात उपचार सुरु
खासदाराच्या प्रचारसभेत आमदाराला आली चक्कर, रुग्णालयात उपचार सुरु.
काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिमांना प्राधान्य देणारा? भाजपच्या टीकेवर....
काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिमांना प्राधान्य देणारा? भाजपच्या टीकेवर.....
राणेंच्या उमेदवारीवरून धाकधूक, नितेश राणेंचं वक्तव्य; एक दिवस थांबा...
राणेंच्या उमेदवारीवरून धाकधूक, नितेश राणेंचं वक्तव्य; एक दिवस थांबा....
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात.
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?.
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली.