10 th Result | 10 वीची वेबसाईट हॅंग प्रकरणी चौकशी समिती स्थापना करणार, वर्षा गायकवाड यांची माहिती

| Updated on: Jul 17, 2021 | 7:54 PM

दहावीच्या निकालात उद्भवलेल्या गोंधळाची चौकशी करण्याचे आदेश राज्य सरकारनं दिले आहेत. संकेतस्थळ डाऊन झालं या प्रकरणी चौकशी करण्यासाठी 5 सदस्यांची समिती स्थापण करण्यात आली आहे. 

Follow us on

कोरोनामुळे 10वी बोर्ड परीक्षा होऊ शकली नाही. त्यामुळे अंतर्गत मूल्यमापनाद्वारे विद्यार्थ्यांचा निकाल लावण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार शुक्रवारी 10 वीचा निकाल जाहीरही करण्यात आला. मात्र, दहावीच्या निकालात उद्भवलेल्या गोंधळाची चौकशी करण्याचे आदेश राज्य सरकारनं दिले आहेत. संकेतस्थळ डाऊन झालं या प्रकरणी चौकशी करण्यासाठी 5 सदस्यांची समिती स्थापण करण्यात आली आहे. पाच सदस्यीय समिती संकेतस्थळाची जबाबदारी कोणाची आहे ? हे निश्चित करेल, त्यानुसार कारवाई करण्याचे आदेश राज्य सरकारनं काढले आहेत. विद्यार्थ्यांची एवढी मोठी संख्या आहे हे माहीत असताना तांत्रिक नियोजन केलं होतं का ? असा, सवाल राज्य सरकारने बोर्डाला विचारला आहे.