4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 7 AM | 5 July 2021
दोन दिवसीय पावसाळी अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता आहे. मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण तसेच इतर मुद्द्यांवरुन विरोधक सत्ताधाऱ्यांना घेरण्याची शक्यता आहे.
आज 5 आणि उद्या 6 जुलैला विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन पार पडणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा अधिवेशनाचे कामकाज दोन दिवसाचे असणार आहे. दरम्यान, पावसाळी अधिवेशनापूर्वी शासनाकडून प्रस्तावित विधेयकांची आणि अध्यादेशांची यादी जाहीर करण्यात आली आहे. या सर्व विधेयक आणि अध्यादेशांवर दोन दिवसीय अधिवेशनात चर्चा करण्यात येणार आहे. त्यामुळे विधानसभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी पाहायला मिळणार आहे.
दोन दिवसीय पावसाळी अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता आहे. मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण तसेच इतर मुद्द्यांवरुन विरोधक सत्ताधाऱ्यांना घेरण्याची शक्यता आहे. तर याच अधिवेशनात सत्ताधारी मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण तसेच केंद्रीय कृषी कायद्यांसंदर्भात प्रस्ताव मांडण्याची शक्यता आहे.
Published on: Jul 05, 2021 08:35 AM
