50 Super Fast News | सुपरफास्ट 50 न्यूज | 2 PM | 6 August 2021

50 Super Fast News | सुपरफास्ट 50 न्यूज | 2 PM | 6 August 2021

| Edited By: | Updated on: Aug 06, 2021 | 2:57 PM

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज भेट घेतली. या दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल सव्वा तास चर्चा झाली. या भेटीत आमची राजकीय चर्चा झाली. पण मनसे-भाजपच्या युतीचा या भेटीत प्रस्ताव देण्यात आलेला नाही. तसेच युतीवर चर्चाही झाली नाही, असं चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलं. 

चंद्रकांत पाटील यांनी राज ठाकरेंची भेट घेतल्यावर मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मीडियाच्या सर्व प्रश्नांना उत्तरे दिली. राज यांच्यासोबत नाशिकमध्ये अचानक भेट झाली. दोघेही प्रवासात होतो. त्यावेळी त्यांनी मुंबईत घरी येण्याचं निमंत्रण दिलं. चहा प्यायला बोलावलं होतं. त्यामुळे मी त्यांना आज भेटलो. त्यांना प्रदेश कार्यालयात का नाही बोलावलं? असा प्रश्न निर्माण होऊ शकतो. पण मी अहंकार मानणारा नाही. त्यांनी घरी बोलावलं म्हणून गेलो. त्यांच्या निमंत्रणाचा स्वीकार केला आणि आलो. या भेटीत राजकीय चर्चा झाली. परंतु, भाजप आणि मनसे युतीचा कोणताही प्रस्ताव या बैठकीत नव्हता. एकमेकांना समजून घेणं, एकमेकांचे विचार सांगणं हा या बैठकीचा विषय होता, असं पाटील यांनी सांगितलं.