आदित्य ठाकरेंचा सवाल: “पालकमंत्र्यांचे बॅनर ए-वन, पण रस्त्यांचं काय?”

आदित्य ठाकरेंचा सवाल: “पालकमंत्र्यांचे बॅनर ए-वन, पण रस्त्यांचं काय?”

| Updated on: Aug 26, 2026 | 2:37 PM

रायगड: रायगड-रत्नागिरी दौऱ्यावर असलेल्या शिवसेना (ठाकरे गट) आमदार आदित्य ठाकरे यांनी पालकमंत्री भरत गोगावले यांच्यावर मुंबई-गोवा महामार्गाच्या अवस्थेवरून जोरदार टीका केली. महामार्गावरील खड्डे, नव्याने बांधलेल्या पुलाची अवस्था आणि टनेलमध्ये साचलेल्या पाण्याचा उल्लेख करत ठाकरे म्हणाले, “पालकमंत्र्यांचे बॅनर A-1 दर्जाचे आहेत; पण रस्ता करायला कोणती स्पेस टेक्नॉलॉजी वापरतात, हेच कळत नाही.” यावेळी त्यांनी मुंबई-गोवा महामार्गाबाबत गेल्या […]

रायगड: रायगड-रत्नागिरी दौऱ्यावर असलेल्या शिवसेना (ठाकरे गट) आमदार आदित्य ठाकरे यांनी पालकमंत्री भरत गोगावले यांच्यावर मुंबई-गोवा महामार्गाच्या अवस्थेवरून जोरदार टीका केली.

महामार्गावरील खड्डे, नव्याने बांधलेल्या पुलाची अवस्था आणि टनेलमध्ये साचलेल्या पाण्याचा उल्लेख करत ठाकरे म्हणाले, “पालकमंत्र्यांचे बॅनर A-1 दर्जाचे आहेत; पण रस्ता करायला कोणती स्पेस टेक्नॉलॉजी वापरतात, हेच कळत नाही.”

यावेळी त्यांनी मुंबई-गोवा महामार्गाबाबत गेल्या दहा वर्षांपासून प्रत्येक गणेशोत्सवापूर्वी रस्ता पूर्ण होण्याची घोषणा केली जाते, मात्र प्रत्यक्षात डागडुजीच होत असल्याचा आरोप केला. “मंत्री पाहणी करतात, अधिकारी येतात, पण रस्त्याची अवस्था कायम तशीच राहते,” अशी टीकाही आदित्य ठाकरेंनी केली.

Published on: Aug 26, 2026 2:37 PM
Follow Us