मोठी बातमी! अभिजीत दीपकेंवर गंभीर गुन्हा दाखल, थेट शासकीय… नेमकं काय घडलं?

मोठी बातमी! अभिजीत दीपकेंवर गंभीर गुन्हा दाखल, थेट शासकीय… नेमकं काय घडलं?

| Updated on: Aug 23, 2026 | 9:44 AM

लातूरच्या औसा पोलीस स्थानकात अभिजीत दिपके आणि चार ते पाच जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. आता या गुन्ह्या प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे.

लातूर जिल्ह्यातील औसा पोलीस स्थानकात अभिजीत दिपके आणि इतर चार ते पाच जणांविरोधात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यांच्यावर शैक्षणिक कामात अडथळा आणल्याचा, एका महिला शिक्षिकेला धमकी दिल्याचा तसेच अपशब्द वापरल्याचा आरोप आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

पीडित शिक्षिकेच्या आरोपानुसार, अभिजीत दिपके यांनी दुसऱ्या शाळेतील मुलांना आणून बसवून एक बनाव रचण्याचा प्रयत्न केला होता. या आरोपांमुळे या प्रकरणातील गुंतागुंत आणखी वाढली आहे. या दाखल झालेल्या गुन्ह्याबाबत अभिजीत दिपके यांनी त्यांची बाजू मांडली आहे. त्यांनी सांगितले की, जिल्हा परिषद शाळेचे सर्वेक्षण केले म्हणून त्यांच्यावर, अजिंक्य शिंदे आणि सीजीपीच्या कार्यकर्त्यांवर औसा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिपके यांनी दावा केला की, काल ते आणि त्यांचे कार्यकर्ते औसा येथील जिल्हा परिषद शाळेत गेले असता, त्या ठिकाणी गांजा आणि दारूचे सेवन केले जात असल्याचे निदर्शनास आले.

शाळेचे वास्तव जगासमोर आणणे हा जर गुन्हा असेल, तर असे हजारो गुन्हे घेण्यासाठी ते तयार असल्याचे दिपके यांनी म्हटले आहे. ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळा जोपर्यंत सुधारत नाहीत आणि गरीब विद्यार्थ्यांना त्यांचे मूलभूत अधिकार मिळत नाहीत, तोपर्यंत सीजीपी आपला लढा कायम ठेवणार असल्याचे आव्हान त्यांनी प्रशासनाला दिले आहे.

Published on: Aug 23, 2026 9:44 AM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us