Aditya Thackearay : आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलं पात्र लिहिलं; नेमकं कारण काय?

Aditya Thackearay : आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलं पात्र लिहिलं; नेमकं कारण काय?

| Updated on: Nov 25, 2026 | 8:28 AM

आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून चाकण एमआयडीसी आणि हिंजवडी आयटी हबमधील समस्यांवर लक्ष वेधले आहे. वाहतूक, पाणीपुरवठा, कचरा व्यवस्थापन आणि वीज पुरवठा यांसारख्या पायाभूत सुविधांचा दर्जा खालावल्याने उद्योजक आणि कर्मचाऱ्यांना अडचणी येत आहेत. यावर मुख्यमंत्र्यांनी मासिक बैठक घेऊन आढावा घेण्याची मागणी त्यांनी केली आहे.

आदित्य ठाकरे यांनी चाकण एमआयडीसी (MIDC) आणि हिंजवडी आयटी हब (IT Hub) मधील गंभीर समस्यांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे. या पत्राद्वारे आदित्य ठाकरे यांनी स्थानिक नागरिक, उद्योजक आणि कर्मचाऱ्यांच्या समस्यांकडे मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले आहे. वाहतूक व्यवस्था, पाणीपुरवठा, घनकचरा व्यवस्थापन आणि वीज पुरवठा या मूलभूत प्रश्नांबाबत त्यांनी चिंता व्यक्त केली आहे.

आदित्य ठाकरे यांनी एक्स (X) वरील पोस्टमध्ये म्हटले आहे की, चाकण एमआयडीसी आणि हिंजवडी आयटी हब मधील नागरिक, उद्योजक आणि कर्मचारी सातत्याने ज्या समस्यांकडे लक्ष वेधत आहेत, त्यांची आठवण करून दिली आहे. राज्यातील अनेक एमआयडीसी क्षेत्रांमध्ये अशाच प्रकारच्या समस्या आहेत. ही दोन्ही ठिकाणे महाराष्ट्राच्या विकासाची पारंपरिक केंद्रे राहिली आहेत. मात्र, अलीकडच्या काळात इथल्या सुविधा आणि पायाभूत सुविधांचा दर्जा खालावल्यामुळे राज्याच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचत आहे.

ठाकरे यांनी सरकारला आवाहन केले आहे की, नोकऱ्या निर्माण करणारे उद्योजक आणि संपत्ती निर्माण करणारे कर्मचारी यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करण्याऐवजी मुख्यमंत्र्यांनी यावर तातडीने लक्ष द्यावे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भात एक बैठक घेऊन आणि दरमहा आढावा घेतल्यास या समस्या प्रभावीपणे सुटू शकतात, अशी सूचना त्यांनी केली आहे. या मागणीमुळे या औद्योगिक आणि आयटी क्षेत्रातील समस्या सोडवण्यासाठी राजकीय दबाव वाढण्याची शक्यता आहे.

Published on: Nov 25, 2026 8:26 AM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us