सुषमा स्वराज यांच्या एका फोनमुळं टळलं सकंट, नाही तर पाकिस्तान अणवस्त्र...

सुषमा स्वराज यांच्या एका फोनमुळं टळलं सकंट, नाही तर पाकिस्तान अणवस्त्र…

| Updated on: Jan 25, 2023 | 2:25 PM

पाकिस्तान बालाकोट सर्जिकल स्ट्राईकनंतर भारतावर अणवस्त्र हल्ला? काय केला अमेरिकेच्या माजी परराष्ट्र मंत्र्याने खळबळजनक दावा?

पाकिस्तान बालाकोट सर्जिकल स्ट्राईकनंतर भारतावर अणवस्त्र हल्ला करणार होता, अशी माहिती अमेरिकेचे माजी परराष्ट्र मंत्री माईक पॉम्पियो यांनी दिली आहे. सुषमा स्वराज यांच्या एका फोनमुळे हे संकट टळलं असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

भारताने बालाकोटमध्ये सर्जिकल स्ट्राईक केल्यानतंर पाकिस्ताने भारतावर अणुबॉम्ब टाकण्याची योजना आखली होती. सुषमा स्वराज यांनी वेळीच निर्णय घेत याची माहिती परराष्ट्र मंत्री माईक पॉम्पियो यांना दिली. तर पाकिस्तानने हल्ला केल्यास प्रतिहल्ल्याची भारतही तयारी करत असल्याचे स्वराज यांनी सांगितले. या फोननंतर पॉम्पियो यांनी तात्काळ अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन यांच्याशी संवाद साधला.

त्यानंतर पाकचे सेना प्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांच्याशीही चर्चा केली. यावेळी त्यांनी अणुयुद्धाची शक्यता फेटाळून लावली होती, तेव्हा पॉम्पियो यांनी जावेद बाजवा यांची समजूत काढली आणि पॉम्पियो यांनी पाक अणुयुद्धाची तयारी करत नसल्याची माहिती भारताला दिली. त्यामुळे सुषमा स्वराज यांच्या एका फोनमुळे मोठं संकट टळल्याचे म्हटले जात आहे.

Published on: Jan 25, 2023 02:22 PM