तर ‘तुतारी’ वाजवून टाका, नवनीत राणांच्या विधानानंतर सुजय विखेंचं वक्तव्य चर्चेत

Harshada Shinkar | Updated on: Apr 18, 2024 | 10:22 AM

मी मान्य नसेल तर लोकांना नरेंद्र मोदींचं नाव सांगा...आणि कुणाचंही नाव मान्य नसेल तर तुतारी वाजवून टाका...असं सुजय विखे पाटील म्हणाले. सध्या महायुतीच्या उमेदवारांची विधानं चर्चेत आणि वादात आहेत. अनेक उमेदवार सेल्फ गोल करून विरोधकांना टीकेची आयती संधी देताय

अहमदनगर लोकसभेतील भाजपचे उमेदवार सुजय विखे पाटील यांच्या एका विधानाने विरोधकांना टीका करण्याची आयती संधी दिली. मी मान्य नसेल तर लोकांना नरेंद्र मोदींचं नाव सांगा…आणि कुणाचंही नाव मान्य नसेल तर तुतारी वाजवून टाका…असं सुजय विखे पाटील म्हणाले. सध्या महायुतीच्या उमेदवारांची विधानं चर्चेत आणि वादात आहेत. अनेक उमेदवार सेल्फ गोल करून विरोधकांना टीकेची आयती संधी देताय. बुलढाण्यात प्रतापराव जाधव नव्हे मोदी उमेदवार आहेत, असं सांगून गुलाबराव पाटलांवर उमेदवारावर अविश्वास दाखवल्याची चर्चा रंगली आहे. यादरम्यान, मी मान्य नसेल तर लोकांना नरेंद्र मोदींचं नाव सांगा…आणि कुणाचंही नाव मान्य नसेल तर तुतारी वाजवून टाका…असं विधान हताश होत सुजय विखे पाटील यांनी केलंय. तर दुसरीकडे अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी मोदींच्या हवेवर विसंबून राहू नका, या वक्तव्याचा विपर्यास झाल्याचे नवनीत राणा यांनी म्हटलंय. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट

Published on: Apr 18, 2024 10:22 AM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us