अभिनेता अजय देवगणला महापालिकेचा मोठा धक्का, थेट जुहूमधील बंगल्याला नोटीस

अभिनेता अजय देवगणला महापालिकेचा मोठा धक्का, थेट जुहूमधील बंगल्याला नोटीस

| Updated on: Sep 24, 2026 | 9:54 AM

अभिनेता अजय देवगणच्या जुहू येथील बंगल्यातील सलून आणि स्पाच्या व्यावसायिक वापरासाठी मुंबई महानगरपालिकेने स्टॉप वर्क नोटीस बजावली आहे. स्थानिक रहिवाशांच्या तक्रारीनंतर, पालिकेने कागदपत्रे मागवली होती. आवश्यक परवानगी नसलेल्या व्यावसायिक वापरामुळे आणि कागदपत्रांची पूर्तता न झाल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे.

अभिनेता अजय देवगणच्या जुहू येथील बंगल्याला मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) के-वेस्ट वॉर्डने ‘स्टॉप वर्क’ नोटीस बजावली आहे. बंगल्यातील जागेचा व्यावसायिक वापर, विशेषतः सलून आणि स्पासाठी, पालिकेच्या परवानगीशिवाय केला जात असल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे. स्थानिक रहिवाशांनी या व्यावसायिक वापराबाबत तक्रार केल्यानंतर, मुंबई महानगरपालिकेने बंगल्याशी संबंधित कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश दिले होते.

मात्र, अजय देवगणच्या कुटुंबीयांकडून परवानगीची आवश्यक कागदपत्रे सादर करण्यात आली नाहीत. यामुळे, पालिकेने जागेवर काम थांबवण्याची नोटीस लावली. सूत्रांनुसार, अजय देवगणच्या प्रतिनिधींनी कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी पालिकेकडे चार आठवड्यांचा वेळ मागितला आहे. तथापि, मुंबई महानगरपालिकेने कोणतीही सूट न देता नोटीस जारी केली आहे. पालिकेच्या नियमांनुसार, निवासी जागेचा व्यावसायिक वापर करण्यासाठी योग्य परवानग्या घेणे बंधनकारक आहे. या प्रकरणी नियमांचे उल्लंघन झाल्यामुळे पालिकेने कठोर भूमिका घेतली आहे.

Published on: Sep 24, 2026 9:54 AM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us