Ajit Pawar Plane Crash | जळालेल्या ब्लॅक बॉक्सचा डेटा परदेशात तपासणीसाठी पाठवण्याची शक्यता

Ajit Pawar Plane Crash | जळालेल्या ब्लॅक बॉक्सचा डेटा परदेशात तपासणीसाठी पाठवण्याची शक्यता

| Updated on: Feb 16, 2026 | 4:25 PM

28 जानेवारी रोजी अजित पवार यांच्या विमानाचा भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत अजित पवार यांच्यासह पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. अजित पवार मुंबईवरून बारामतीकडे जात असताना बारामती विमानतळावर उतरताना विमानावरील नियंत्रण सुटले आणि विमान जमिनीवर जोरात आदळले. त्यानंतर मोठा स्फोट होऊन विमानाला आग लागली. या अपघातानंतर दुसऱ्याच दिवशी विमानातील ब्लॅक बॉक्स सापडला.

28 जानेवारी रोजी अजित पवार यांच्या विमानाचा भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत अजित पवार यांच्यासह पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. अजित पवार मुंबईवरून बारामतीकडे जात असताना बारामती विमानतळावर उतरताना विमानावरील नियंत्रण सुटले आणि विमान जमिनीवर जोरात आदळले. त्यानंतर मोठा स्फोट होऊन विमानाला आग लागली. या अपघातानंतर दुसऱ्याच दिवशी विमानातील ब्लॅक बॉक्स सापडला. मात्र तो जळालेल्या अवस्थेत असल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे. त्यामुळे त्यातील डेटा सुरक्षित आहे की नाही, याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. ब्लॅक बॉक्समधील माहिती मिळवणे अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे. त्यासाठी हा ब्लॅक बॉक्स परदेशात पाठवण्याची शक्यता वर्तवली जात आहे. केंद्र सरकार याबाबत लवकरच निर्णय घेऊ शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. अपघाताबाबत काही जणांकडून शंका व्यक्त केल्या जात असल्याने ब्लॅक बॉक्समधील डेटा तपासासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. डेटा रिकव्हर झाल्यानंतरच अपघाताचे नेमके कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

 

Published on: Feb 16, 2026 04:25 PM