अमित साटम अंधेरीचे डोनाल्ड डक अन् त्यांच्यात पाकड्यांचा DNA, मनसे नेत्याची जहरी टीका

अमित साटम अंधेरीचे डोनाल्ड डक अन् त्यांच्यात पाकड्यांचा DNA, मनसे नेत्याची जहरी टीका

| Updated on: Jan 05, 2026 | 5:10 PM

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अखिल चित्रे यांनी भाजप नेते अमित साटम यांच्यावर गंभीर टीका करत त्यांच्या डीएनएवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. अखिल चित्रे यांनी अमित साटम यांना "अंधेरीचा डोनाल्ड डक" असं म्हणत जहरी टीका केली आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अखिल चित्रे यांनी भाजप नेते अमित साटम यांच्यावर गंभीर टीका करत त्यांच्या डीएनएवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. अखिल चित्रे यांनी अमित साटम यांना “अंधेरीचा डोनाल्ड डक” असं म्हणत जहरी टीका केली आहे. त्यांनी असा आरोप केला की अमित साटम हे पाकिस्तानच्या रिपोर्टर आणि पत्रकारांना सोशल मीडियावर फॉलो करतात.

अखिल चित्रे यांनी पत्रकार परिषदेचा संदर्भ देत म्हटले की, अमित साटम यांनी कथितरित्या सांगितले होते की कोविड-१९ च्या काळात मुंबईची परिस्थिती पाकिस्तानपेक्षाही वाईट होती. ही माहिती एका पाकिस्तानी पत्रकाराने दिली होती, असा उल्लेखही अखिल चित्रे यांनी केला. “खाल्ल्या मिठाला ते जागत असतील,” असे उपरोधिकपणे म्हणत अखिल चित्रे यांनी अमित साटम यांच्या निष्ठांवर संशय व्यक्त केला. तर या सर्व घटनाक्रमातून अमित साटम यांचा डीएनए पाकड्यांचा असल्याचे सिद्ध होते, असा दावा अखिल चित्रेंनी करत त्यांच्यावर हल्लाबोल केला.

 

 

Published on: Jan 05, 2026 05:10 PM