बीड लोकसभेत जातीचं कार्ड नेमकं कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान चर्चेत

| Updated on: Apr 26, 2024 | 10:38 AM

बीडचं राजकारण पुन्हा नेहमीच्याच वळणावर आलंय. उपोषणाला बसून काय होत नाही. या पंकजा मुंडेंच्या विधानावरून त्याची सुरूवात झाली आहे. तर धनंजय मुंडे यांनी कुणबी प्रमाणपत्रावरून बजरंग सोनावणे यांना लक्ष्य केल्याने त्यात अजून भर पडली आहे. बीडची निवडणूक नेहमी मराठा विरूद्ध वंजारी अशी रंगते. मात्र यंदा काहीसं चित्र वेगळं दिसतंय. बघा स्पेशल रिपोर्ट...

Follow us on

बीड लोकसभेत जातीपातीवरून राजकारण करण्याचे आरोप होतायत. यावरूनच धनंजय मुंडे यांनी विरोधकांवर बोट दाखवलं. तर मुंडेच जिल्ह्याचं राजकारण जातीपातीकडे नेत असल्याचा आरोप बजरंग सोनावणे यांनी केलाय. बीडचं राजकारण पुन्हा नेहमीच्याच वळणावर आलंय. उपोषणाला बसून काय होत नाही. या पंकजा मुंडेंच्या विधानावरून त्याची सुरूवात झाली आहे. तर धनंजय मुंडे यांनी कुणबी प्रमाणपत्रावरून बजरंग सोनावणे यांना लक्ष्य केल्याने त्यात अजून भर पडली आहे. जात निवडणुकीत आणू नका, असं आवाहन करताना धनंजय मुंडे यांनी स्वतःच कुणबी प्रमाणपत्राचा विषय छेडला. त्यामुळे धनंजय मुंडे पंकजा मुंडे यांना पाडण्याचा प्लान आखत नाही ना? अशी शंका विरेंद्र पवार यांनी व्यक्त केली आहे. बीडची निवडणूक नेहमी मराठा विरूद्ध वंजारी अशी रंगते. मात्र यंदा काहीसं चित्र वेगळं दिसतंय. बघा स्पेशल रिपोर्ट…