Amit shah Pune Visit | अमित शाहांच्या आगमनाची जय्यात तयारी तर पहा! व्हिडीओ आला समोर
पुण्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या आगमनाची जय्यत तयारी करण्यात आली आहे. त्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर भाजपचे स्थानिक नेते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. अमित शाह यांनी पुण्यात दाखल झाल्यानंतर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्या स्वागतासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली होती.

दरम्यान, राष्ट्रीय सल्लागार अजित डोवाल यांना लोकमान्य टिळक पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते हा पुरस्कार दिला जाणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे या कार्यक्रमाकडे राजकीय आणि सामाजिक क्षेत्राचे लक्ष लागले आहे.
या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार तसेच एकनाथ शिंदे यांच्यासह भाजपचे अनेक स्थानिक नेते उपस्थित आहेत. अमित शाह यांच्या दौऱ्यामुळे पुण्यात राजकीय वातावरणही चांगलेच तापले आहे. कार्यक्रमस्थळी सुरक्षेची विशेष व्यवस्था करण्यात आली असून, विविध भागांतून नेते आणि कार्यकर्ते दाखल होत आहेत. त्यामुळे पुरस्कार सोहळ्याला मोठी उपस्थिती पाहायला मिळण्याची शक्यता आहे.