अनिल परब यांनी ईडीसमोर हजर राहण्यासाठी तारीख वाढवून मागितली

| Updated on: Jun 16, 2022 | 10:38 AM

महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अनिल परब यांच्या संबंधित ईडीने छापेमारी केली होती. त्यांच्या चौकशी होणार आहे.

Follow us on

मुंबई: अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) राज्याचे परिवहन मंत्री आणि शिवसेना नेते अनिल परब यांना बुधवारी त्यांच्याविरुद्ध चौकशी सुरू असलेल्या मनी लाँड्रिंग प्रकरणात त्यांचे म्हणणे नोंदवण्यासाठी समन्स बजावले आहे. आज परबांनी ईडीकडे तारिख वाढवून घेतल्याची माहिती मिळाली आहे. विशेष म्हणजे अनिल परब शिर्डी दौऱ्यावर असल्याने ईडीच्या चौकशीला गैरहजर राहिले आहेत. पुढच्या तारखेला हजर राहणार असल्याचं त्यांनी ईडीला पत्राद्वारे कळविले आहे. अनिल परबांनी त्यांच्या वकीलामार्फत ईडीला पत्र दिलं आहे. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अनिल परब यांच्या संबंधित ईडीने छापेमारी केली होती. त्यांच्या चौकशी होणार आहे.