Anjali Damania : धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे नेमके संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल, गंभीर आरोप काय?

Anjali Damania : धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे नेमके संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल, गंभीर आरोप काय?

| Updated on: Jul 09, 2025 | 7:17 PM

धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडचे आर्थिक संबंध असल्याचे म्हणत सामाजित कार्यकर्ता अंजली दमानिया यांनी गंभीर आरोप केले आहेत. दरम्यान, अंजली दमानिया यांनी ट्वीटरवरही धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्यात कसे आर्थिक संबंध आहेत? याचे पुरावे शेअर केले आहे.

बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येनंतर बीड जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. इतकंच नाहीतर या प्रकरणानंतर राज्यातील राजकीय वातावरणही चांगलंच तापलं आहे. अशातच धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडचे आर्थिक संबंध असल्याचे म्हणत सामाजित कार्यकर्ता अंजली दमानिया यांनी गंभीर आरोप केले आहेत. तर येत्या २८ डिसेंबर रोजी वाल्मिक कराडविरोधात अंजली दमानिया या ठिय्या आंदोलन करणार असल्याची माहिती मिळतेय. तर वाल्मिक कराडला अटक होईपर्यंत ठिय्या आंदोलन करणार असल्याचा इशारा अंजली दमानिया यांच्याकडून देण्यात आला आहे. धनंजय मुंडे यांचा उजवा हात तसेच अत्यंत जवळचे निकटवर्तीय वाल्मिक कराड असल्याची त्यांची ओळख आहे. दरम्यान, अंजली दमानिया यांनी ट्वीटरवरही धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्यात कसे आर्थिक संबंध आहेत? याचे पुरावे शेअर केले आहे. यामध्ये धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांची ८८ एकर जमीन एकत्र असल्याचा दावाही त्यांनी केलाय. बघा नेमकं

Published on: Dec 24, 2024 02:14 PM