Anjali Damania : सुपेकरांची मुजोरी, पीआयकडून पैसे अन् दिवाळीला सोनं घ्यायचे… दमानियांचा खळबळजनक गौप्यस्फोट काय?
वैष्णवी हगवणे प्रकरणात चौकशी सुरू असताना जालिंदर सुपेकर यांचं नाव पुढे आलं ते हगवणे कुटुंबीयांचे नातलग असून त्यांच्यावर मोठे गंभीर आरोप करण्यात आलेत. अशातच दमानियांनी खळबळजनक गौप्यस्फोट केलाय.
जालिंदर सुपेकर यांनी अमरावतीच्या तुरुंगात असलेले कैदी गायकवाड यांच्याकडे 550 कोटींची मागणी केल्याचा आरोप नुकताच समोर आला. इतकंच नाहीतर गायकवाड पितापुत्रांचं सोनं जप्त करताना सुपेकर यांनी 150 कोटींचा भ्रष्टाचार केल्याचाही आरोप त्यांच्यावर करण्यात आला. यासंदर्भात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीही आपली प्रतिक्रिया दिली आहे. 550 कोटी रूपये दे आणि जेलमधून बाहेर ये नाहीतर जेलमध्येच राहशील, असं सुपेकरांनी कैद्याला सांगितलं असल्याचं दमानिया यांनी म्हटलंय. तर साडेतीन तास जेलमध्ये जालिंदर सुपेकर यासाठी बसले होते. अमरावतीचे जेलर हे त्यांचे नातलग असल्याचेही दमानिया यांनी म्हटलंय. दमानियांनी पुढे असेही सांगितले की, सुपेकर हे पीआयकडून पैसे घ्यायचे, दिवाळीला सोनं घ्यायचे अशी माहिती आहे. सुपेकरांच्या या पराक्रमाबाबत गृहमंत्र्यांना पत्र पाठवणार असल्याचे दमानिया यांनी म्हटलंय.
