शिवसेनेला पुन्हा धक्का? शिंदे गटात आणखी एक आमदार सहभागी होणार

शिवसेनेला पुन्हा धक्का? शिंदे गटात आणखी एक आमदार सहभागी होणार

| Updated on: Jun 27, 2022 | 9:18 AM

आज आणखी एक धक्का शिवसेनेला बसण्याची शक्यता आहे. सूत्रांकडून मिळत असलेल्या माहितीप्रमाणे शिवसेनेचा आणखी एक आमदार आज शिंदे गटात सहभागी होणार आहे. हा आमदार आज दुपारी मुंबईहून गुवाहाटीला जाण्याची शक्यता आहे.

शिवसेनेच्या 40 पेक्षा अधिक आमदारांनी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिल्याने शिवसेनेच्या अडचणी वाढल्या आहेत.  महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आल्याचे चित्र आहे. रविवारी उदय सामंत हे देखील शिंदे गटात सहभागी झाले आहेत. आता आज आणखी एक धक्का शिवसेनेला बसण्याची शक्यता आहे. सूत्रांकडून मिळत असलेल्या माहितीप्रमाणे शिवसेनेचा आणखी एक आमदार आज शिंदे गटात सहभागी होणार आहे. हा आमदार आज दुपारी मुंबईहून गुवाहाटीला जाण्याची शक्यता आहे.

Published on: Jun 27, 2022 09:18 AM