मोठी बातमी! अरविंद केजरीवाल, सिसोदीया यांना ताब्यात घेतलं, दिल्लीतील आंदोलनात धरपकड सुरूच

मोठी बातमी! अरविंद केजरीवाल, सिसोदीया यांना ताब्यात घेतलं, दिल्लीतील आंदोलनात धरपकड सुरूच

| Updated on: Oct 10, 2026 | 4:13 PM

दिल्ली पोलिसांनी आंदोलनादरम्यान आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांना ताब्यात घेतले. ममता बॅनर्जी आणि मनीष सिसोदिया यांच्यानंतर केजरीवाल यांनाही उचलून नेण्यात आले. राजधानी दिल्लीत मोठ्या संख्येने आंदोलकांची धरपकड करत त्यांना बसेसमध्ये टाकण्यात आले असून, परिस्थिती तणावपूर्ण आहे.

दिल्ली पोलिसांनी आंदोलनादरम्यान आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांना ताब्यात घेतल्याचा एक व्हिडिओ सध्या समोर आला आहे. ममता बॅनर्जी आणि मनीष सिसोदिया यांच्यानंतर आता अरविंद केजरीवाल यांनाही दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ‘मी सहकुटुंब आंदोलनात सहभागी होणार’ अशी भूमिका त्यांनी घेतली होती, मात्र आंदोलनात जाण्यापूर्वीच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. केजरीवाल यांना अक्षरशः उचलून घेऊन ताब्यात घेण्यात आले. केवळ केजरीवालच नाही, तर ध्रुव राठी यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

राजधानी दिल्लीत भाजपच्या विरोधात सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान पोलिसांकडून मोठ्या प्रमाणावर धरपकड सुरू आहे. अनेक आंदोलकांना बसेसमध्ये टाकण्यात आले आहे. या ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, आंदोलक रस्त्यावर बसून जोरदार घोषणाबाजी करत आहेत. महिला पोलीसही या कारवाईत सहभागी आहेत. मोठ्या संख्येने आंदोलकांना ताब्यात घेण्यात आले असून, दिल्लीतील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

Published on: Oct 10, 2026 4:13 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us