Arvind Kejriwal | मी तुमच्या कोर्टात हजर राहणार नाही, तुमच्याकडून न्याय मिळण्याची अपेक्षा संपलीय… थेट सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना केजरीवालांचं पत्र, सत्याग्रह करण्याचा घेतला निर्णय

Arvind Kejriwal | मी तुमच्या कोर्टात हजर राहणार नाही, तुमच्याकडून न्याय मिळण्याची अपेक्षा संपलीय… थेट सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना केजरीवालांचं पत्र, सत्याग्रह करण्याचा घेतला निर्णय

| Updated on: Apr 27, 2026 | 11:10 AM

दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे संयोजक अरविंद केजरीवाल यांच्याशी संबंधित मद्य धोरण प्रकरणात नवा वाद निर्माण झाला आहे. सत्र न्यायालयाने केजरीवाल यांना दिलेल्या निर्दोष मुक्ततेच्या निर्णयाविरोधात तपास यंत्रणांनी दिल्ली उच्च न्यायालयात अपील दाखल केले आहे. या प्रकरणाची सुनावणी न्यायमूर्ती स्वर्णकांता शर्मा यांच्या खंडपीठासमोर होणार आहे.

दरम्यान, अरविंद केजरीवाल यांनी न्यायमूर्ती स्वर्णकांता शर्मा यांच्या न्यायालयात हजर राहणार नसल्याची भूमिका जाहीर केली आहे. यासंदर्भात त्यांनी न्यायमूर्तींना पत्र लिहून, “मी स्वतः किंवा वकिलामार्फत तुमच्यासमोर हजर होणार नाही. तुमच्याकडून न्याय मिळण्याची अपेक्षा संपली आहे,” असे स्पष्ट केले आहे. तसेच, महात्मा गांधी यांच्या सत्याग्रहाच्या मार्गावर चालण्याचा निर्णय घेतल्याचेही केजरीवाल यांनी नमूद केले आहे. न्यायालयीन निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा अधिकार राखून ठेवला असल्याचे त्यांनी सांगितले. यापूर्वी केजरीवाल यांनी या प्रकरणातील खंडपीठ बदलण्याची मागणी करत याचिका दाखल केली होती. न्यायमूर्ती स्वर्णकांता शर्मा यांनी एका विशिष्ट विचारधारेशी संबंधित कार्यक्रमात सहभाग घेतल्याचा उल्लेख करत, “न्यायाधीश जर त्या विचारधारेचे समर्थक असतील आणि मी विरोधक असेन, तर मला न्याय कसा मिळेल?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
दरम्यान, या प्रकरणात कायदेशीर लढाईपेक्षा नैतिक आणि वैचारिक विरोधाचा मार्ग स्वीकारणार असल्याचे केजरीवाल यांनी स्पष्ट केले असून, या भूमिकेमुळे राजकीय आणि कायदेशीर वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

Published on: Apr 27, 2026 11:10 AM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us