Asha Bhosle Passed Away | आशा भोसलेंचं निधन, शिवाजी पार्कातील स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार

Asha Bhosle Passed Away | आशा भोसलेंचं निधन, शिवाजी पार्कातील स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार

| Updated on: Apr 13, 2026 | 10:22 AM

स्वरसम्राज्ञी आशा भोसले यांचे वयाच्या 93 व्या वर्षी निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने संपूर्ण देशात शोककळा पसरली आहे. त्यांच्या आठ दशकांच्या कारकिर्दीत केवळ मराठी किंवा हिंदीच नव्हे, तर बंगालीसह अनेक भारतीय भाषांमध्ये त्यांनी आपल्या आवाजाची जादू पसरवली. 12 हजारांहून अधिक गाणी त्यांनी गायली. त्यांनी संगीतप्रेमींच्या मनावर अधिराज्य गाजवले.

स्वरसम्राज्ञी आशा भोसले यांचे वयाच्या 93 व्या वर्षी निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने संपूर्ण देशात शोककळा पसरली आहे. त्यांच्या आठ दशकांच्या कारकिर्दीत केवळ मराठी किंवा हिंदीच नव्हे, तर बंगालीसह अनेक भारतीय भाषांमध्ये त्यांनी आपल्या आवाजाची जादू पसरवली. 12 हजारांहून अधिक गाणी त्यांनी गायली. त्यांनी संगीतप्रेमींच्या मनावर अधिराज्य गाजवले. 8 सप्टेंबर 1933 रोजी जन्मलेल्या आशा भोसले यांनी वयाच्या अवघ्या 10 व्या वर्षापासून गायनाला सुरुवात केली. 1933 ते 1960 च्या दशकात त्यांनी गायलेली गाणी आजही तितकीच लोकप्रिय आहेत. शास्त्रीय संगीत, गझल, भजन, कॅबरे आणि पॉप अशा विविध संगीत प्रकारांमध्ये त्यांनी स्वतःला सिद्ध केले आहे. दिल चीज क्या है’, ‘उडे जब जब जुल्फे तेरी’ आणि ‘चैन से हमको कभी’ यांसारखी अजरामर गाणी त्यांच्या अफाट प्रतिभेची साक्ष देतात. आर. डी. बर्मन यांच्यासोबतच्या त्यांच्या गाण्यांनी चित्रपट संगीताला एक वेगळीच उंची मिळवून दिली.

मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर त्यांना तातडीने मुंबईतील ब्रीचकॅन्डी रुग्णालय येथे दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज दुपारी 4 वाजता छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथील स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्याआधी त्यांचे पार्थिव लोअर परेल येथील निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले आहे. दरम्यान, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोअर परेल येथील त्यांच्या निवासस्थानी जाऊन आशा भोसले यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले आणि त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.

Published on: Apr 13, 2026 10:22 AM
Follow Us