Asha bhosle | स्वरसाम्राज्ञीचा निरोप! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतले आशाताईंचे अंत्यदर्शन

Asha bhosle | स्वरसाम्राज्ञीचा निरोप! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतले आशाताईंचे अंत्यदर्शन

| Updated on: Apr 13, 2026 | 3:46 PM

ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले यांचं काल (रविवार, 12 एप्रिल) निधन झालं. दक्षिण मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्या 92 वर्षांच्या होत्या. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीदेखली आशा भोसले यांना श्रद्धांजली वाहिली.

सकाळपासूनच सिनेसृष्टीतील अनेक कलाकर आणि नेते आशा भोसले यांच्या अंतिम दर्शनासाठी येत आहेत. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील उपस्थित झाले असून त्यांचासह संजय शिरसाट, आशीष शेलार, शंभुराज देसाईदेखील आहेत.आशाताईंच्या चाहत्यांनीही सकाळपासून इथे गर्दी केल्याचं पहायला मिळत आहे. अगदी थोड्याचं वेळात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर त्यांना तातडीने मुंबईतील ब्रीचकॅन्डी रुग्णालय येथे दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज दुपारी 4 वाजता छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथील स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्याआधी त्यांचे पार्थिव लोअर परेल येथील निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले आहे.

Published on: Apr 13, 2026 3:46 PM
Follow Us