Ritu Tawade | आषाढी एकादशीला मुंबईच्या महापौर रितू तावडे यांचा विठुरायाला अभिषेक; वडाळ्यात भाविकांचा जनसागर!

Ritu Tawade | आषाढी एकादशीला मुंबईच्या महापौर रितू तावडे यांचा विठुरायाला अभिषेक; वडाळ्यात भाविकांचा जनसागर!

| Updated on: Jul 25, 2026 | 12:42 PM

आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त मुंबईतील वडाळा येथे असलेल्या प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री विठ्ठल मंदिरात भक्तिमय वातावरणात महाअभिषेक आणि विशेष पूजा पार पडली. यावेळी मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी श्री विठ्ठल-रुक्मिणीची विधिवत पूजा करून आशीर्वाद घेतला.

या धार्मिक सोहळ्यावेळी महापौर रितू तावडे यांच्यासोबत त्यांचे पती राजेश तावडे हेही उपस्थित होते. मंदिरात आयोजित करण्यात आलेल्या महाअभिषेकात त्यांनी सहभाग घेतला आणि विठुरायाच्या चरणी राज्याच्या तसेच मुंबईकरांच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना केली.

दरम्यान, आषाढी एकादशीच्या निमित्ताने पहाटेपासूनच विठुरायाच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली. “विठ्ठल… विठ्ठल…” आणि “ज्ञानोबा-तुकाराम”च्या जयघोषाने मंदिर परिसर भक्तिमय वातावरणाने दुमदुमून गेला.

यावेळी बोलताना महापौर रितू तावडे यांनी महापूजेचा मान मिळाल्याबद्दल मंदिर प्रशासनाचे आभार मानले. तसेच संपूर्ण मुंबईकरांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा देत सर्वांच्या आयुष्यात सुख, शांती आणि समृद्धी नांदो, अशी प्रार्थना श्री विठ्ठल चरणी केल्याचे त्यांनी सांगितले.

Published on: Jul 25, 2026 12:41 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us