Ashok Kharat Hearing | भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून तीन दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी

Ashok Kharat Hearing | भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून तीन दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी

| Updated on: Mar 29, 2026 | 1:10 PM

भोंदूबाबा अशोक खरातला आज न्यायालयात हजर करण्यात आले. तपास अधिकारी किरण सूर्यवंशी यांनी कोर्टासमोर त्याला प्रकरणाचा ‘मास्टरमाइंड’ असल्याचे म्हटले. पोलिसांनी आरोपीला आणखी तीन दिवसांची पोलीस कोठडी द्यावी अशी मागणी केली आहे. तपास अधिकारी म्हणतात, “आता आम्हाला सामोरासमोर चौकशी करणे आवश्यक आहे.

भोंदूबाबा अशोक खरातला आज न्यायालयात हजर करण्यात आले. तपास अधिकारी किरण सूर्यवंशी यांनी कोर्टासमोर त्याला प्रकरणाचा ‘मास्टरमाइंड’ असल्याचे म्हटले. पोलिसांनी आरोपीला आणखी तीन दिवसांची पोलीस कोठडी द्यावी अशी मागणी केली आहे. तपास अधिकारी म्हणतात, “आता आम्हाला सामोरासमोर चौकशी करणे आवश्यक आहे.” तपासादरम्यान, खरातच्या मोबाईलमधील डेटा रिकव्हर करण्यात आला असून, पीडितांना दिलेल्या पाण्याचे, पेढ्यांचे आणि इतर खाद्यपदार्थांचेही तपास करण्यात येणार आहे. तसेच, त्याने खरेदी केलेल्या जंगम मालमत्तांसह सर्व प्रॉपर्टीची माहिती गोळा करण्याचे काम सुरू आहे.
सरकारी वकिलांनी कोर्टात सांगितले की, “प्रकरण अत्यंत संवेदनशील असून, महाराष्ट्र आणि देशाचे लक्ष या प्रकरणावर लागले आहे. प्रकरणाची व्याप्ती मोठी असून, अनेक पीडित धाडस दाखवत समोर येत आहेत. त्यामुळे आरोपीला आणखी तीन दिवस पोलीस कोठडीत ठेवणे आवश्यक आहे.”

Published on: Mar 29, 2026 01:10 PM
Follow Us