Sanjay Raut Full Press | राज्यातील 9 मंत्री लिंगपिसाट बाबाचे अनुयायी, ही तर खरात फाईल; संजय राऊत यांचा खळबळजनक दावा

| Updated on: Mar 20, 2026 | 11:57 AM

भोंदू बाबा अशोक खरात याचं प्रकरण सध्या संपूर्ण राज्यात चर्चेत आहे. त्याच्यावर लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत. पोलिसांनी त्याला अटक केली असून न्यायालयाने 24 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. अशोक खरातवर अनेक गंभीर आरोप आहेत. राज्यातील काही मोठे नेते, राजकारणी आणि सेलिब्रिटी त्याच्या संपर्कात होते, अशी माहिती समोर आली आहे.

भोंदू बाबा अशोक खरात याचं प्रकरण सध्या संपूर्ण राज्यात चर्चेत आहे. त्याच्यावर लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत. पोलिसांनी त्याला अटक केली असून न्यायालयाने 24 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. अशोक खरातवर अनेक गंभीर आरोप आहेत. राज्यातील काही मोठे नेते, राजकारणी आणि सेलिब्रिटी त्याच्या संपर्कात होते, अशी माहिती समोर आली आहे. तसेच त्याने कोट्यवधी रुपयांची संपत्ती जमवल्याचाही आरोप केला जात आहे. या प्रकरणामुळे राज्यातील राजकारण तापले आहे. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी या प्रकरणावर टीका करत, याची तुलना जगभर गाजलेल्या “एपस्टिन फाइल्स”शी केली आहे. “जगात एप्सटिन फाइल्स, तर महाराष्ट्रात खरात फाइल्स,” असे ते म्हणाले. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात गृहखात्यामार्फत गुप्तपणे कारवाई सुरू केली होती, अशी माहिती समोर आली आहे. गेल्या 15 दिवसांपासून पोलिसांची पथके या प्रकरणावर काम करत होती आणि ही कारवाई यशस्वी ठरल्याचे सांगितले जात आहे. यासाठी संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांचे अभिनंदनही केले आहे. तसेच, अशा प्रकारच्या प्रकरणात कारवाई होत असेल तर ते कौतुकास्पद असल्याचे त्यांनी म्हटले. खरात हा काही मंत्र्यांचा ‘गुरू’ असल्याचा आरोप असून त्याची चौकशी सुरू आहे. त्याच्या मोबाईलमध्ये काही आक्षेपार्ह व्हिडिओ सापडल्याची माहिती आहे. त्यामुळे काही मंत्री तणावाखाली असल्याचे सांगितले जात आहे, तर काहींना आरोग्याच्या कारणामुळे रुग्णालयात दाखल करावे लागल्याचेही समोर आले आहे. राऊत यांच्या म्हणण्यानुसार, सध्याच्या मंत्रीमंडळातील सुमारे 9 मंत्री हे खरातचे नियमित अनुयायी होते. ते त्याच्याकडे जाऊन अयोग्य आणि घृणास्पद विधी करत होते, असा आरोपही त्यांनी केला आहे.

Published on: Mar 20, 2026 11:56 AM
Follow Us