Ashok Kharat Case Update | अशोक खरात प्रकरणात नवा खुलासा; एका विशिष्ट तारखेला खरातने अनेक पतसंस्थेत खाते उघडले?

Ashok Kharat Case Update | अशोक खरात प्रकरणात नवा खुलासा; एका विशिष्ट तारखेला खरातने अनेक पतसंस्थेत खाते उघडले?

| Updated on: Apr 05, 2026 | 1:37 PM

अशोक भोंदू खरात प्रकरणात नवनवीन धक्कादायक खुलासे समोर येत असून तपास अधिक गतीने पुढे सरकत आहे. या प्रकरणात आता आर्थिक व्यवहारांचा मुद्दा पुढे आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अशोक खरात यांनी एका विशिष्ट तारखेला अनेक पतसंस्था आणि बँकांमध्ये खाती उघडल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

अशोक भोंदू खरात प्रकरणात नवनवीन धक्कादायक खुलासे समोर येत असून तपास अधिक गतीने पुढे सरकत आहे. या प्रकरणात आता आर्थिक व्यवहारांचा मुद्दा पुढे आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अशोक खरात यांनी एका विशिष्ट तारखेला अनेक पतसंस्था आणि बँकांमध्ये खाती उघडल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्या तारखेचे नेमके महत्त्व काय, याबाबत पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे. या संदर्भात संबंधित पतसंस्था आणि बँकांकडून सर्व व्यवहारांची माहिती पोलिसांनी मागवली असून, आर्थिक हालचालींचा तपशील तपासला जात आहे. विश्वसनीय सूत्रांनी ही माहिती दिली आहे. दरम्यान, अनेक पतसंस्था आणि बँकांचे व्यवहार सध्या पोलिसांच्या रडारवर आले असून, या प्रकरणात मोठा आर्थिक गैरव्यवहार उघड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान भोंदू खरातचा मुलगा हर्षवर्धन खरात हाही पोलिसांच्या नजरेआड झाल्याने प्रकरणाला आणखी गंभीर वळण मिळाले आहे. विशेष तपास पथकाने (SIT) हर्षवर्धन खरात याची सलग दोन दिवस कसून चौकशी केली होती. या चौकशीदरम्यान त्याने काही महत्त्वाचे आणि धक्कादायक खुलासे केल्याची माहिती समोर येत आहे. मात्र, चौकशी संपल्यानंतर तो अचानक संपर्काबाहेर गेला असून त्याचा ठावठिकाणा अद्याप लागलेला नाही.

Published on: Apr 05, 2026 01:37 PM
Follow Us