Trupati Desai on Ashok Kharat Case | अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; तृप्ती देसाईंनी केला घाम फुटणारा आरोप

Trupati Desai on Ashok Kharat Case | अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; तृप्ती देसाईंनी केला घाम फुटणारा आरोप

| Updated on: Apr 03, 2026 | 1:05 PM

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात दररोज नवे खुलासे समोर येत असून, या प्रकरणाला आता अधिकच वेग आला आहे. याच पार्श्वभूमीवर तृप्ती देसाई यांनी पत्रकार परिषद घेत गंभीर आरोप केले आहेत. देसाई यांनी सांगितले की, समता नागरी पतसंस्थेमध्ये 100 पेक्षा अधिक बनावट खाती उघडण्यात आली होती.

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात दररोज नवे खुलासे समोर येत असून, या प्रकरणाला आता अधिकच वेग आला आहे. याच पार्श्वभूमीवर तृप्ती देसाई यांनी पत्रकार परिषद घेत गंभीर आरोप केले आहेत. देसाई यांनी सांगितले की, समता नागरी पतसंस्थेमध्ये 100 पेक्षा अधिक बनावट खाती उघडण्यात आली होती. विशेष म्हणजे, या सर्व खात्यांमध्ये नॉमिनी म्हणून अशोक खरात यांचेच नाव असल्याचा दावा त्यांनी केला. “या माध्यमातून काळा पैसा पांढरा करण्याचा प्रकार काही लोकांच्या मदतीने करण्यात आला,” असा आरोप त्यांनी केला. त्या पुढे म्हणाल्या की, संबंधित खात्यांसाठी काही लोकांनी स्वतःची ओळखपत्रे, आधारकार्ड वापरण्याची परवानगी दिली होती. मात्र, आता हा प्रकार उघडकीस आल्यानंतर या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी होणे आवश्यक आहे.
या प्रकरणात काही नातेवाईक किंवा संबंधित व्यक्तींचा सहभाग असण्याची शक्यता व्यक्त करत, “कोणत्याही व्यक्तीचा यात सहभाग असेल, त्याची चौकशी एसआयटीमार्फत होऊन सत्य लवकरात लवकर समोर आले पाहिजे,” अशी मागणी तृप्ती देसाई यांनी केली आहे.

Published on: Apr 03, 2026 01:04 PM
Follow Us