Ashok Kharat | अशोक खरात प्रकरणात ट्विस्ट; भोंदू खरातचा मुलगा हर्षवर्धन नॉट रिचेबल असल्याची माहिती

Ashok Kharat | अशोक खरात प्रकरणात ट्विस्ट; भोंदू खरातचा मुलगा हर्षवर्धन नॉट रिचेबल असल्याची माहिती

| Updated on: Apr 05, 2026 | 9:06 AM

भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणात नवनवीन धक्कादायक घडामोडी समोर येत आहेत. या प्रकरणाच्या तपासादरम्यान पोलिसांसमोर एकामागून एक नवी आव्हाने उभी राहत असून तपास अधिक गुंतागुंतीचा होत चालला आहे. अशोक खरात याची पत्नी कल्पना खरात गेल्या काही दिवसांपासून फरार असून तिचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून विशेष मोहीम राबवली जात आहे. त्यातच आता त्याचा मुलगा हर्षवर्धन खरात हाही पोलिसांच्या नजरेआड झाल्याने प्रकरणाला आणखी गंभीर वळण मिळाले आहे.

भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणात नवनवीन धक्कादायक घडामोडी समोर येत आहेत. या प्रकरणाच्या तपासादरम्यान पोलिसांसमोर एकामागून एक नवी आव्हाने उभी राहत असून तपास अधिक गुंतागुंतीचा होत चालला आहे. अशोक खरात याची पत्नी कल्पना खरात गेल्या काही दिवसांपासून फरार असून तिचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून विशेष मोहीम राबवली जात आहे. त्यातच आता त्याचा मुलगा हर्षवर्धन खरात हाही पोलिसांच्या नजरेआड झाल्याने प्रकरणाला आणखी गंभीर वळण मिळाले आहे. विशेष तपास पथकाने (SIT) हर्षवर्धन खरात याची सलग दोन दिवस कसून चौकशी केली होती. या चौकशीदरम्यान त्याने काही महत्त्वाचे आणि धक्कादायक खुलासे केल्याची माहिती समोर येत आहे. मात्र, चौकशी संपल्यानंतर तो अचानक संपर्काबाहेर गेला असून त्याचा ठावठिकाणा अद्याप लागलेला नाही. अशोक खरातला अटक झाल्यानंतर त्याच्या कुटुंबातील सदस्यांच्या भूमिकेबाबत पोलिसांकडून चौकशी सुरू होती. कल्पना खरात हिचा शोध घेत असताना पोलिसांनी हर्षवर्धनला ताब्यात घेतले होते. मात्र, चौकशी पूर्ण झाल्यानंतर तो कोणतीही पूर्वसूचना न देता गायब झाल्याने तपास यंत्रणांसमोर नवे प्रश्न निर्माण झाले आहेत. एकाच कुटुंबातील दोन महत्त्वाचे सदस्य फरार झाल्याने या संपूर्ण रॅकेटची व्याप्ती आणि त्याची पाळेमुळे किती खोलवर रुजलेली आहेत, याचा शोध घेण्याचे मोठे आव्हान आता पोलिसांसमोर उभे राहिले आहे. या प्रकरणातील पुढील घडामोडीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Published on: Apr 05, 2026 09:06 AM
Follow Us