Assam Flood | आसाममध्ये महापूराचं संकट कायम; 24 तासांत मृतांचा आकडा 31 वर

Assam Flood | आसाममध्ये महापूराचं संकट कायम; 24 तासांत मृतांचा आकडा 31 वर

| Updated on: Jul 23, 2026 | 4:42 PM

आसाममध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पूरस्थिती अत्यंत गंभीर बनली असून, राज्यातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. सततच्या पावसामुळे अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडत रौद्ररूप धारण केले आहे.

आसाममध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पूरस्थिती अत्यंत गंभीर बनली असून, राज्यातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. सततच्या पावसामुळे अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडत रौद्ररूप धारण केले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासांत पुराशी संबंधित घटनांमध्ये आणखी 21 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आसाममधील पुरामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांची एकूण संख्या आता 31 वर पोहोचली आहे.

या भीषण पुराचा फटका राज्यातील 15 जिल्ह्यांना बसला असून, सुमारे 5 लाख 64 हजार नागरिक पूरग्रस्त झाले आहेत. अनेक गावांचा संपर्क तुटला असून, हजारो नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

दरम्यान, प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन पथके बचाव व मदतकार्य राबवत असून, पूरग्रस्त भागांमध्ये अन्न, पिण्याचे पाणी आणि अत्यावश्यक साहित्य पोहोचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. हवामान विभागाने पुढील काही दिवसही मुसळधार पावसाचा इशारा दिल्याने परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

Published on: Jul 23, 2026 4:42 PM
Follow Us