नाना पटोले, मंत्री सरनाईक आणि शंभुराज देसाई यांच्याही घरी बाप्पाचं स्वागत
महाराष्ट्रातील अनेक कलाकारांच्या घरात गणपती उत्सव त्याच थाटामाटात आणि पारंपारिकपणे साजरा केला जातो. तसेच राजकीय मंडळींच्या घरात देखील आता बाप्पा दरवर्षी प्रमाणे यंदाही आले आहेत.
महाराष्ट्रासह देशात गणपती बाप्पाचं आगमन झाले आहे. त्यामुळे सर्वत्र उत्साह आणि मांगल्याचं वातावरण तयार झाले आहे. यातच अभिनेते स्वप्नील जोशी यांच्यासह अनेक कलाकारांसह राजकीय नेत्यांच्या घरात देखील गणपती बाप्पाचं आगमन झाले आहे. मंत्री शंभुराज देसाई यांच्या निवासस्थानी पारंपारिक पद्धतीने पालखीतून गणपती बाप्पाचे आगमन झाले आहे. तसेच काँग्रेसचे नाना पटोले यांच्याही घरी लाडक्या बाप्पाचं आगमन झाले आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे तसेच परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याही निवासस्थानी गणपती बाप्पा विराजमान झाले आहेत. आता दहा दिवस महाराष्ट्रातील घराघरात गणपती बाप्पाचे आगमन झालेले आहे. त्यामुळे गणपती बाप्पाच्या सेवेत आता भक्तमंडळी अगदी मनोभावे रमणार आहेत.
Published on: Aug 27, 2025 12:52 PM
