Sanjay Raut | सुनेत्रा पवारांसाठी ठाकरे गट काय भूमिका घेणार? बारामती पोटनिवडणुकीबाबत संजय राऊतांनी मांडले स्पष्ट मत

Sanjay Raut | सुनेत्रा पवारांसाठी ठाकरे गट काय भूमिका घेणार? बारामती पोटनिवडणुकीबाबत संजय राऊतांनी मांडले स्पष्ट मत

| Updated on: Apr 06, 2026 | 12:04 PM

बारामतीतील अगामी पोटनिवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय हालचालींना वेग आले आहे. दरम्यान ठकारे गट सुनेत्रा पवारांना पाठिंबा देणार का? यावर पुन्हा संजय राऊतांनी मत मांडले आणि पत्रकारांच्या प्रश्नांची उत्तरे दिली.

बारामतीतील अगामी पोटनिवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय हालचालींना वेग आले आहे. दरम्यान ही पोटनिवडणूक बिनविरोध होण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांकडून प्रयत्न सुरू आहेत. यानिमित्ताने वारंवार विचारला जाणारा प्रश्न म्हणजे ठकारे गट सुनेत्रा पवारांना पाठिंबा देणार का? यावर पुन्हा संजय राऊतांनी मत मांडले आणि पत्रकारांच्या प्रश्नांची उत्तरे दिली.

माध्यमांशी संवाद साधताना संजय राऊत म्हणाले की, हा आमचा एकट्याचा प्रश्न नाही तर महाविकास आघाडीत अनेक राजकिय पक्षसुद्धा आहेत. पुढे ते म्हणाले, ‘माझ्यामाहिती नुसार काँग्रेसने बारामतीत उमेदवार दिला आहे. तसेच सुनेत्रा पवार या आता महायुतीचा भाग आहेत त्यामुळे आम्हाला विचार करावा लागेल.’ ‘आज त्या अर्ज भरत आहेत, पोट निवडणूकीला भरपूर वेळ आहे तेव्हा पाहु…’ ‘सध्या सुनेत्रा पवार अर्ज भरत आहेत त्यांना आमच्या शुभेच्छा,’ असंही संजय राऊत म्हणाले.

Published on: Apr 06, 2026 12:04 PM
Follow Us