Sanjay Raut Full Press | एकनाथ शिंदें ऐवजी सुनेत्रा पवार मुख्यमंत्री होणार? संजय राऊतांचं नेमकं विधान काय?

| Updated on: Apr 13, 2026 | 12:25 PM

बारामती विधानसभा पोटनिवडणुकीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या या जागेसाठी निवडणूक जाहीर झाली असून, राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुनेत्रा पवार या उमेदवार म्हणून रिंगणात उतरल्या आहेत. सध्या त्या प्रचारात सक्रिय असून पवार कुटुंबाकडूनही प्रचारात सहभाग होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे, मात्र याबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही.

या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली. ही निवडणूक कौटुंबिक विषय असून फक्त एका निवडणुकीपुरती आहे, पुढील निवडणूक बिनविरोध होणार नाही, असे ते म्हणाले. तसेच ही निवडणूक आपण अजित पवार यांना श्रद्धांजली म्हणून पाहायला हवी, असेही त्यांनी नमूद केले.
पुढे बोलताना राऊत यांनी सुनेत्रा पवार यांच्या संभाव्य भूमिकेबाबतही भाष्य केले. अजित पवार यांना मुख्यमंत्री होता आले नाही, मात्र सुनेत्रा पवार यांना भाजपकडून मुख्यमंत्रीपदासाठी पुढे केले जाऊ शकते, तर तो भाजपचा मोठेपणा ठरेल, असे ते म्हणाले. तसेच देवेंद्र फडणवीस दिल्लीकडे जाण्याआधी एकनाथ शिंदे यांच्या ऐवजी सुनेत्रा पवारांची निवड करतात का, अशीही शक्यता त्यांनी व्यक्त केली. बारामती पोटनिवडणुकीमुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ होण्याची शक्यता आहे.

Published on: Apr 13, 2026 12:25 PM
Follow Us