Sharad Pawar | बारामतीत काँग्रेसने उमेदवार दिला, शरद पवारांचं मत काय? म्हणाले निवडणुकीत…

Sharad Pawar | बारामतीत काँग्रेसने उमेदवार दिला, शरद पवारांचं मत काय? म्हणाले निवडणुकीत…

| Updated on: Apr 07, 2026 | 10:18 AM

बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. यावेळी बारामतीच्या पोटनिवडणुकीबाबत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनीही महत्त्वाचं वक्तव्य केलं.

बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय हालचालींना वेग आलं आहे. दिवंगत नेते अजित पवार यांच्या रिक्त झालेल्या जागेवर ही निवडणूक लढवली जात असून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी सत्ताधारी पक्षांकडून जोरदार हालचाली सुरू असून, बारामतीत राजकीय घडामोडींना वेग आला आहे. यावेळी बारामतीच्या पोटनिवडणुकीबाबत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनीही महत्त्वाचं वक्तव्य केलं.

महाविकास आघाडीकडे पाठिंबा मागितला असूनही अविआतील बारामती पोटनिवडणुकीमध्ये काँग्रेसने आपला उमेदवार दिला आहे, यावर देखील शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. समोर कुणीतरी लढेल हे मान्य करूनच निवडणुकीत उभं राहावं लागतं. एखाद्या मतदारसंघात राजकीय पक्षाने भूमिका घेतली तर हा राजकीय विषय नाही. राज्याचा विषय नाही, असंही यावेळी शरद पवार यांनी म्हटलं आहे.

Published on: Apr 06, 2026 6:17 PM
Follow Us