Sharad Pawar | पोटनिवडणुकीतील समीकरणांचा नवा खेळ, थेट महायुतीतील राष्ट्रवादीच्या मेळाव्यात शरद पवारांचा फोटो

Sharad Pawar | पोटनिवडणुकीतील समीकरणांचा नवा खेळ, थेट महायुतीतील राष्ट्रवादीच्या मेळाव्यात शरद पवारांचा फोटो

| Updated on: Apr 06, 2026 | 1:38 PM

बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय हालचालींना वेग आलं आहे. आज उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या अर्ज दाखल करणार अहेत, दरम्यान महायुतीतील राष्ट्रवादीच्या मेळाव्यात थेट शरद पवारांचा फोटो लावलेला असल्याने वेगळ्याच चर्चांना उधाण आले आहे.

बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय हालचालींना वेग आलं आहे. दिवंगत नेते अजित पवार यांच्या रिक्त झालेल्या जागेवर ही निवडणूक लढवली जात असून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या थोड्यावेळातच उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी सत्ताधारी पक्षांकडून जोरदार हालचाली सुरू असून, बारामतीत राजकीय घडामोडींना वेग आला आहे. यादरम्यान एक महत्त्वाची बाब सर्वाचे लक्ष वेधून घेत आहे ती म्हणजे, राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या या मेळाव्यात शरद पवारांचा फोटो लावलेला दिसत आहे.

महत्त्वाची बाब म्हणजे सुनेत्रा पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष हा महायुतीचा भाग आहे तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीची युती ही महाविकास आघाडीशी आहे. यादरम्यान सुनेत्रा पवार यांनी सर्व पक्षीय नेत्यांशी चर्चा करुन पाठिंब्याची मागणी केली होती तर अनेकांकडून ती मान्य झाली आहे. ठाकरे गटाकडून पाठिंबा मिळणार की नाही हे अजून निश्चित झाले नाही. मात्र काँग्रेस पक्षाने बारामतीत त्यांचा उमेदवार दिला आहे.

Published on: Apr 06, 2026 01:38 PM
Follow Us